जिल्हा स्पर्धेत गुरुकृपा आखाड्यातील विद्यार्थीनी २३ पदके पटकावले 

जिल्हा स्पर्धेत गुरुकृपा आखाड्यातील विद्यार्थीनी २३ पदके पटकावले

कन्हान,ता.२१ ऑगस्ट

    १८ वी आष्टे डु मर्दानी आखाडा जिल्हा स्तरीय स्पर्धा रामटेक येथे घेण्यात आले. यात गुरुकृपा आखाडा राम सरोवर, टेकाडी च्या विद्यार्थ्यानी शिवकलेत सुर्वण पदक १३, रजत पदक ६ व कास्य पदक ४ असे एकुण २३ पदक प्राप्त करून जिल्हयात अव्वल स्थान पटकाविले.


रामटेक येथे नुकतेच पार पडलेल्या १८ वी आष्टे डु मर्दानी आखाडा जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध तालुक्यातील १९ आखाड्यानी सहभाग घेतला. या स्पर्धेत हस्तकला, पदसंतुलन, जिजाऊ ढाल व शिवकला स्पर्धा घेण्यात आल्या. शिवकलेत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

यात गुरूकृपा आखाडा रामसरोवर टेकाडीचे कुणाल कांबळे, श्रेया हूड, धनश्री मदनकर, ऋतुजा राऊत, अनिकेत निमजे, दिशा चव्हाण, निकिता बेले, सुरज चव्हाण, खुशी मदनकर, पूर्वेश नाईक, निधी नाईक, अमोल कांबळे, आदेश आंबागडे या १३ विद्यार्थ्याने सुवर्ण पदक प्राप्त केले. जानवी पारधी, मोनाली आकरे, मनिष वालोदे, वरद आकोटकर, मनस्वी कांबळे, उज्वल कांबळे या ६ विद्यार्थ्याना रजत पदक तर सिद्धार्थ सातपैसे, जानवी सातपैसे, जिया कांबळे, सोनम गूळधे या ४ विद्यार्थ्यानी कांस्य पदक प्राप्त केले.

गुरुकृपा आखाडा रामसरोवर, टेकाडी च्या विद्यार्थ्यानी शिवकलेत १३ सुवर्ण, ६ रजत व ४ कास्य असे एकुण २३ पदक मिळवुन प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हयात अव्वल स्थान पटकाविल्याने. आखाडा प्रशिक्षक निलेश गाढवे व सहकारी अभिजित चांदुरकर, प्रविण चव्हाण आणि विजयी सर्व विद्यार्थ्यांवर विविध स्तरातुन कौतुकाच्या वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आष्टे डु जिल्हा क्रिडा स्पर्धेत जय भवानी दाणपट्टा विजापुर (खंडाळा) चे सुयश  

Mon Aug 21 , 2023
आष्टे डु जिल्हा क्रिडा स्पर्धेत जय भवानी दाणपट्टा विजापुर (खंडाळा) चे सुयश कन्हान,ता.२१ ऑगस्ट    १८ वी आष्टेडु मर्दानी आखाडा नागपुर जिल्हास्तरिय स्पर्धा रामटेक येथे घेण्यात आल्या. जय भवानी दाणपट्टा आखाडा विजापुर (खंडाळा) च्या विद्यार्थ्यानी शिवकलेत सुर्वण पदक, रजत पदक व कास्य पदक आणि प्रोत्सहानपर पुरस्कार प्राप्त करून गावाचे नावलौकिक […]

You May Like

Archives

Categories

Meta