ईटगाव शिवारात विवाहित महिलेची हत्या

*ईटगाव शिवारात विवाहित महिलेची हत्या*

पराशिवनी:- पाराशिवनी पोलिस स्टेशन च्या हद्दीत कार्यक्षेत्रातील ईटगाव शिवारात महिलेची हत्या तिच्या पतीने केली.  गाव शिवारात तामसवाडी येथील लहानु दांढ़े यांच्या शेतात मध्यप्रदेशातील चे रहवासी ममता धुर्वे वय 40 व पती जग्गु धूर्वे वय ४५ हे पती-पत्नी शेतातील शेत काम करण्यासाठी घरीच राहत होते, पण पती जग्गू धुर्वे हा पत्नीचे चरित्रावर नेहमी संशय घेत असल्याने त्याचे नेहमिच भांडण होत होती .

सोमवार दिनांक 17 ऑगस्ट चा रात्री पती जग्गू हा दारू पिऊन आला व पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण करू लागला व नशेतच त्यांनी पत्नीच्या गळा दाबून तिच्या खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतक पत्नी ममता हिच्या अंगावरील कपडे बदलून शेतातील घरी पलंगावर झोपून ठेवले व मंगलवार दिनांक 18 ऑगस्ट स्वतःहून पोलिसांना सूचना देऊन माझी पत्नी शेतात एका दगडावर पडल्याने मरण पावली असे बनावट नाटक करून तो मी नव्हेच ची भूमिका घेत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलीस तपासात हत्या झाल्याची समोर येतात आरोपी पतीला अटक करण्यात आले.

ममता तिचा मुलगा 20 वर्षिय आपल्या मध्यप्रदेशातील मुळगावी राहतो आज पोळाच्या सण शेतकरी आपल्या जीवन प्रमाणे साभाळणार्‍या बैलांना पुरणपोळीच्या घास भरवतो ,असा सणाच्या पर्व पूर्व साध्ये संध्येला  एका निर्दय पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर संदेह घेत पत्नी ममता चा गळा दाबुन ठार केले त्यामुळे परिसरातील गावात उलटसुलट चर्चेला ऊत आलेला आहे .

देह उतरीय तपासाणी साठी पाराशिवनी दवाखानात पाठविले आरोपी विरूध्द कलम ३०२,२०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला .घटनेचे सखोल तपास पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गव्हाणे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Wed Aug 19 , 2020
सावनेर शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा… *कोरोना विषाणूंच्या सावटाखाली सोशल डिस्टंन्सींग मधे ठिक ठिकाणी ध्वजारोहन…* *सावनेर :  74 वा स्वातंत्र्य दीन उत्साहात साजारा करण्यात आला कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भावामुळे शाळा व शैक्षणिक संस्थाने बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची व तरुणाईची उल्हासवर्धक कमतरते सोबतच कर्णप्रीय देशभक्ती गीतांच्या अनुपस्थितीतही सर्व ठीकाणी ध्वजारोहण करण्यात आले* […]

You May Like

Archives

Categories

Meta