सत्रापुर येथील दुकानाच्या डॉवर मधिल पर्स चोरी

सत्रापुर येथील दुकानाच्या डॉवर मधिल पर्स चोरी

#) मंगळसुत्र व नगदी तीन हजार रू.एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी. 


कन्हान : –  सत्रापुर येथील सौ वैशाली मेश्राम यांच्या दुकानातील डॉवर मध्ये पर्स ठेऊन घराच्या आत चहा बनविण्या करिता जाऊन परत येत पर्यंत अज्ञात चोरा ने पर्स व त्यातील २४ ग्रम सोन्याचे मंगळसुत्र व नगदी ३ हजार रू. असा एकुण ७३ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. 

             गुरूवार (दि.९) ला ६.३० ते ७.३० वाजता दरम्यान सत्रापुर येथील सौ वैशाली विजेंद्र मेश्राम वय ३३ वर्ष यांचे घरीच असलेल्या जनरल स्टोर चे दुकान  सकाळी ६.३० वा उघडले व काही वेळाने पाच मिनटा करिता घरामध्ये चहा बनवण्याकरिता गेली असता कोणीतरी अज्ञात चोराने जनरल स्टोर चा पैसे ठेवण्या चे खुल्या डॉवर चा आत पर्स मध्ये ठेवलेल २४ ग्रॅम सोन्याचे जुने मंगलसुत्र किमंत ७०,००० रूपये व नगदी ३,००० रूपये असे एकुण ७३,००० रूपयाचा मुद्देमाल असलेली पर्स चोरून नेल्याने फिर्यादी सौ वैशाली मेश्राम यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला अज्ञात चोरा विरूध्द अप क्र ३३३/२१ कलम ३८० भादंवि नुसार गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस स्टेशन निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात पो हवा. अरूणकुमार सहारे पुढील तपास करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नाम मात्र राशन कार्ड लाभार्थी, राशन धान्या पासुन वंचित

Sat Sep 11 , 2021
नाम मात्र राशन कार्ड लाभार्थी, राशन धान्या पासुन वंचित #) नाम मात्र दक्षता समिति व अधिका-यांमुळे नागरिकांचा खेळखंडोबा.  कन्हान : –  तालुक्यातील नागरिकांचे शिधापत्रिका (राशन कार्ड) बनुन एक वर्षाचा कालावधी लोटुन लाभार्थी धान्या पासुन वंचित आहे. तसेच बंद असले ली अंतोदय राशन कार्ड योजना सुरू करून त्यांचे सुध्दा राशन कार्ड त्वरित बनवुन सर्व […]

You May Like

Archives

Categories

Meta