अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान,ता.०६ फेब्रुवारी 

  शहरातील नागरिकां मध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अशोक नगर येथील कुख्यात आरोपी तेनाली राऊत याचा राहत्या घराची कन्हान पोलीसांनी झडती घेतली. अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचे मिळुन आल्याने पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

      पोलिसांच्या माहिती नुसार, रविवार (दि.४) जानेवारी ला सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान तेनाली राऊत रा. कन्हान हा आपल्या साथीदारसह धारदार शस्त्र घेऊन जुन्या भांडण्याचा वादातुन मारण्याचा उद्देशाने अक्षय नाटकर यांचा घरी जावुन त्याला आणि त्याचा परिवाराला अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि राहुल डी चव्हान, पराग फुलझले, हरीष सोनभद्रे, आकाश सिरसाट, मुदस्सर जमाल, सम्राट वनपर्ती, निखिल मिश्रा, वैभव बोरपल्ले सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन माहिती घेतली. तेनाली राऊत याचा घरी धारदार शस्त्र असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी स्टाफ च्या मदतीने तेनाली राऊत याचा राहते घरी त्याचा शोध घेणे व घरझडती घेणे कामी गेले.  तेनाली राऊत याचे वडील संतोष नारायण मधुमटके (वय ४९) रा. कन्हान व त्याची आई घरी मिळुन आल्याने पोलीसांनी घरी येणाचे कारण सांगुन घराची झडती घेतली. आलमारीचे मागे धारदार चाकु, कोयता असे एकुण १२ लोखंडी शस्त्र मोठ्या मिळुन आल्याने पोलीसांनी जागीच पंचनामा करुन जप्त केले. आरोपी संतोष मधुमटके व तेनाली राऊत याची आई यांनी संगनमता ने जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी नागपुर यांचे कलम ३७(१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्यवे काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन आपल्या राहत्या घरी अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचे मिळुन आल्याने पोलीसांनी आरोपी संतोष मधुमटके व आई विरुद्ध अप क्र. ६२/२४ कलम ४, २५, १३५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रीय पदक विजेते बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार 

Tue Feb 27 , 2024
राष्ट्रीय पदक विजेते बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार  कन्हान,ता.२८ फेब्रुवारी      सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळाची राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे पार पडली. यात नागपुर जिल्हयाने वीस पदक पटकाविले असुन बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थी खेडाळुनी अकरा पदक जिकुन शाळेचे नाव लौकीक केल्याने या विजेते खेडाळुंचा शाळेच्या वतीने थाटात जल्लोषात सत्कार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta