आठवळी बाजारात तरुणांच्या टोळीने तलवारी फीरवत धुमाकूळ  टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर व पोलिसांवर‌ हल्ला  पो.विभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्यावर कारवाईची मागणी 

आठवळी बाजारात तरुणांच्या टोळीने तलवारी फीरवत धुमाकूळ

टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर व पोलिसांवर‌ हल्ला

 पो.विभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्यावर कारवाईची मागणी

कन्हान ता,४ फेब्रुवारी

     पारशीवनी तालुक्यातील कन्हान शहरातील आठवडी बाजारात तरुणांच्या टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. नागरिकांनी या घटनेचा विरोध करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर रास्ता रोको केल्याने पोलीस स्टेशन मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे पाहून आमदार आशिष जैस्वाल, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, नगराध्यक्ष सौ.करुणा आष्टणकर आणि उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचून जमावाला शांत केले.

    शुक्रवारी संध्याकाळी बारा ते पंधरा तरुणांची टोळी शस्त्रांसह परिसरात दाखल झाली आणि त्यांनी महामार्ग क्रमांक ४४ वर असलेल्या दुकानदारांसह स्थानिक नागरिकांवर हल्ला चढवला. १२ ते १५ तरुणांनी हवेत तलवारी घेऊन दुभाजकावर उभे राहून तलवारीने वार केला, पायदळ एका व्यक्तीलासुद्धा तलवारीचा वार झाला, काही जणांना किरकोळ दुखापत झाली, मात्र ते पोलिसांच्या गोंधळात न पडता तेथून निघून गेले तर दुसरीकडे महिला घाबरून सेरावैरा पळून गेल्या, लहान मुले फीरत असताना पळून गेली, गरीब पुरुषांच्या दुकानातील सामान लुटले.

या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून मदतीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही या तरुणांच्या टोळीने हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपअधीक्षक, विभागीय अधिकारी मुक्तार बागवान, कन्हान ठाणेदार विलास काळे यांनी घटनास्थळी पाहणी केली.तर दुसरीकडे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या समक्ष पोलिस विभागीय अधिकारी मुख्तार बागवान यांच्यासह पोलिस निरीक्षक विलास काळे यांनी कन्हान परिसरात वाळू, कोळसा, ड्रग्जसह, जुगार, सट्टेबाजीचा धंदा वाटून देऊन आरोपींचा पुडका असून सामान्य माणसाची दखल घेतलेली जात नसल्याचा सांगत चांगलीच कान उघडनी केली. दोन महिन्यांपूर्वी तडीपारची शिक्षा भोगून‌ तरुण परतल्याची चर्चा असून त्यांने पोलिसांच्या मदतीने जुआ परीसरात सुरू असताना नागपूर गुन्हे शाखेनी कारवाई करून बंद केले. त्यामुळे आपल्या बद्दल माहिती सतरापूर येथे सुरू असलेल्या तरुणांनी टीप दिल्याचे भासुन टोळीने त्यांच्या वर सुद्धा हल्ला केल्याची परीसरात चर्चा आहे. यानंतर शुक्रवारी आठवळी बाजारात दहशत निर्माण केली.

 काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस उदयसिंग यादव, मनोहर पाठक, अतुल हजारे, राजा शेंद्रे, राजेश यादव, वर्धराज पिल्ले आदी नगरसेवक यांच्यासह सुमारे ५०० ते ६०० जमावाने ठाणेदार आरोपींना ओलीस घालण्याचा आरोप करून पोलीस प्रशासनाविरोधात मुर्दाबाद…मुर्दाबाद अशा घोषणा देत रास्ता रोको केले . यावेळी पोलीस अधीक्षक विशाल आनंद पोलीस आमदार आशिष जयस्वाल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता नागपूर स्थानिक गुन्हे शाखेसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आला.

 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आमदारांसह स्थानिक नेते घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी चर्चा सुरू होती. दरम्यान, जमावाने दोन आरोपींना बेदम मारहाण केली. ज्यांची कशीतरी सुटका करून कन्हान रूग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरात गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत. या संदर्भात विभागीय अधिकारी मुख्तार बागवान यांच्यासह पोलिस निरीक्षक विलास काळे यांना अनेकदा माहिती देण्यात आली. असे असतानाही शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा बसू शकलेला नाही .घटनेनंतर आमदार आशिष जैस्वाल यांनी गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून घटनेची माहिती देताच फडणवीस यांनी तातडीने अधीक्षक विशाल आनंद यांना योग्य कारवाईच्या सूचना दिल्या. या घटनेबाबत ठाणेदाराची व वीभागीय अधिकारी यांची बदली करण्याची मागणी जोरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शहर काँग्रेस तर्फे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत

Sun Feb 5 , 2023
शहर काँग्रेस तर्फे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत सावनेर : नुकत्याच पार पडलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे सावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार व माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या सावनेर आगमना निमित्त शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta