गहुहिवरा रोडवरील बांधकामाच्या लोखंडी सळाखी चोरी

गहुहिवरा रोडवरील बांधकामाच्या लोखंडी सळाखी चोरी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ४ कि मी अंतरावर असलेल्या गहुहिवरा परिसरातील माॅडन लॅड डेवलपर्स येथुन अज्ञात चोरट्याने प्लाॅट नं.१०३ येथील बांधकामाच्या लोखंडी सळाखी किंमत २५,४९७ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त माहिती नुसार चंदु उमराव नागपुरे वय ३६ वर्ष राह. हनुमान नगर डफाळे ले आऊट कन्हान हा प्रायवेट प्लंबर चे काम करत असुन त्याचे स्वताचे गहुहिवरा परिसरातील माॅडन लॅड डेवलपर्स प्लाट नं. १०३ येथे ५००० स्क्वेयर फीट प्लाॅट असुन तिथे काजु मॅनफॅक्चरींग कंपनीचे बांधकाम सुरू असल्याने (दि. १३) डिसेंबर ला पारस ब्लिडिंग मटेरियल सप्लायर्स कांद्री येथुन १२ एमएम, १० एमएम, ३३० एमएम, ८ एमएम च्या लोखंडी सळाथी किंमच ८६,९६० रूपया चा विकत घेत प्लाॅट वर ठेवला होता. त्यातील काही खर्च झाला. जोत्या पर्यंत काम झाले असुन (दि.२७) डिसेंबर २०२१ ला चंदु नागपुरे दिवसभर प्लाॅट वर गेला नसल्याने रात्री ८ वाजता दरम्यान खेडी गावातील राह. अभिजीत गांधी यांनी फोन करून सांगितले की, तुझ्या प्लाॅट वर चा लोखंडी सळाखी रोडावर पडलेला दिसत आहे. तेव्हा ८:३० वाजता दरम्यान प्लाॅट वर पोहोचला असता त्यांना रोडावर लोहा पडला दिसला असता तो न उचलला नाही व ९:३० वाजता दरम्यान तीन, चार लोक दुचाकी वाहनाने लोखंड उचलण्या करिता आले तेव्हा चंदु नागपुरे त्याचे मागे धावले अस ता एक अँक्टीवा क्र. एम एच ३१ बी जे ७२९८ दुचाकी वाहन सोडुन ते लोक पळुन गेले. या आधी त्या चोरट्यांनी लोखंडी सळाख अंदाजे १२ एमएम चे सात बंडल किंमत १९,७७७ व १० एमएम चे दोन बंडल किंमत ५७२० रुपयाचा माल दिसला नसल्याने त्या अज्ञात चोरट्यांनी एकुण २५,४९७ रुपयांच्या लोखंडी सळखी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी चंदु उमराव नागपुरे यांच्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र ४७१/२०२१ कलम ३७९ भांद वि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वराडा शेत शिवारात बिबटयाने जर्शी कारवड व वासराची केली शिकार

Wed Jan 5 , 2022
वराडा शेत शिवारात बिबटयाने बाधलेल्या जर्शी कारवड व वासरा ची शिकार केली कन्हान : – पारशिवनी तालुकातील वराडा शेत शिवारात कोठया जवळील जागेवर बाधलेल्या जर्शी गाय कारवळ व वासरा ला एका बिबटयाने सोमवारी पहाटे हल्ला करित जर्शी कारवळ ला ठार केले तर वासरा ला गंभीर जख्मी केल्याने ही परिसरातील तिसरी […]

You May Like

Archives

Categories

Meta