ग्रोमर वेंचर्स मुद्यावरुन कन्हान नगर परिषदेच्या सभेत गोंधळ
मुलभुत सुविधा करिता जागेचा उपयोग करा- स्थानिकांची मागणी
कन्हान,ता.२५ ऑगस्ट
कन्हान-पिपरी नगरपरिषद मध्ये शुक्रवार रोजी झालेल्या विशेष सभेत ग्रोमर वेंचर्स मुद्यावरुन चांगलाच गोंधळ झाल्याची चर्चा असुन शहरातील मुलभुत सुविधा करिता हिंदुस्तान लिवर कंपनीच्या जागेचा उपयोग करावा अशी मागणी स्थानिकांनी न.प.प्रशासनाला निवेदनातून केली.

शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिवर कंपनीची जागा ग्रोमर वेंचर्स कंपनीने खरेदी केल्यानंतर शहराचा सर्वांगीन विकासा वर प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीचा जागेवर बस स्टेन्ड, साप्ताहिक बाजार व गुजरी बाजार, मटन मार्केट, खेळाचे मैदान, उपजिल्हा रुग्णालय, सांस्कृतिक कार्यालय, सुलभ शौचालय, विविध प्रकारचे कार्यालय, गौवंश शाळा सह अशा अनेक विविध प्रकारचे सुविधा उपलब्ध करण्याचा मागणी करिता कन्हान- कांद्री दुकानदार महासंघ, सर्वपक्षीय दल आणि विविध सामाजिक संघटनच्या पदाधिकार्यांनी व नागरिकांनी नगर परिषद समोर धरणा आंदोलन, साखळी उपोषण करुन व निवेदन पत्र देऊन देखील नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रशासना ला आमदार, खासदार, ग्रोमर वेंचर्सचे अधिकारी या मोठ्या नेत्यांचा दबाव तर नाही ना, अशा अनेक चर्चेला उधाण आले आहे.

शुक्रवार (दि.२५) ऑगस्ट ला नगर परिषद मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. विषय क्र. ४ मध्ये ग्रोमर वेंचर्स कंपनी द्वारे हिंदुस्तान कंपनीची जागा खरेदी केलेली संपत्तीचे औद्योगिक जागेचे रुपांतर राहण्याचा जागेसाठी करायचे का ? असा ठराव घेण्यात आला होता. पण सभेत या विषया वर चर्चा करण्यापुर्वी माजी नप उपाध्यक्ष डॉ.मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात संतापलेल्या उपस्थित दुकानदारांनी नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर यांचा कार्यलयात प्रवेश करुन ठरावाचा विरोध करित कंपनीची जागा मुलभुत सुविधा करिता उपयोगासाठी आणण्याची मागणी केली.

या मुद्यावरुन सभेत चांगलाच गोंधळ झाला असुन नगरसेवक, नगरसेविकांनी या ठरावा विरोधात आपले मत मांडल्याने ठराव नामंजूर झाला आहे. आता नगर परिषद प्रशासन या मुद्यावर आपली काय भुमिका मांडतो या कडे सर्व दुकानदारांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच दुकानदार बांधवांनी हिंदुस्तान लिवर कंपनी जागेचा उपयोग शहरातील मुलभुत सुविधा करिता करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
Post Views: 729
Mon Aug 28 , 2023
वेकोलिच्या ब्लॉस्टींग मुळे बापासह लेकीचा दुदैवी मृत्यु दोषी अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कन्हान,ता.२८ ऑगस्ट वेकोलि कामठी खुली खदान च्या दगान (ब्लॉस्टींग) मुळे वार्ड क्र.१ हरीहर नगर, कांद्री येथील घर कोसळल्याने मलमा खाली बापासह सहा वर्षाच्या लेकीचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना घडताच परिसरात शोककळा पसरून […]