माजी खा.प्रकाश जाधव यांच्या पुढाकाराने गोंडेगाव ग्रामस्थांला वेकोलिचे सहकार्य

माजी खा.प्रकाश जाधव यांच्या पुढाकाराने गोंडेगाव ग्रामस्थांला वेकोलिचे सहकार्य

  1. वेकोलि गोंडेगाव च्या दुर्लक्षते मुळे घरात पावसाचे पाणी शिरून घराचे नुकसान

कन्हान,ता.10 ऑगस्ट

     गोंडेगावात पावसाचे पाणी कोळसा खुली खदान च्या डम्पींग मातीसह पाणी घरात शिरून उदारामजी शिंगणे यांच्या घरातील जिवनापयोजी वस्तुचे नुकसान व कृपाविलास गजभिये यांचे घर पडुन दोन्ही घरची मंडळी निराधर होत संकटात सापडल्याने वेकोलि गोंडेगाव प्रशासनाने त्वरित दोन्ही घरच्या लोकांची राहण्याची व्यवस्था करित जिवनापयोगी अन्य, धान्य व साहित्याची मदत मानुष्कीच्या नात्याने त्वरित करण्यास मा.प्रकाश भाऊ जाधव यांच्या पुढाकाराने गोंडेगाव उपक्षेत्र अधिकारी मा.ठाकरे यांनी सहकार्य करण्यास मान्य केले.


वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान व्दारे गावा सभोवताल माती डम्पींग करून उंचच उंच टेकडया निर्माण करून गावाला खोलगट भागात केल्याने पावसाचे पाणी वाहणारे नाले गावालगत असुन या नाल्याची पावसाळयापुर्वी व्यवस्थित खोलीकरण व चौडाई करण न करण्यात आल्याने वेकोलि परिसरातील व टेकडयाचे पावसाचे पाणी सह माती वाहुन नाले सवान होऊन पाणी निकासी न झाल्याने गावातील घरात सोमवार (दि.८) सप्टेंबर उदारामजी शिंगणे यांच्या घरात पाणी शिरून घरातील जिवनापयोगी अन्य, धान्य, सामान व जनावराचा कडबा, कुडार पाण्यात वाहुन गेल्याने या कुंटुबाचे अतोनात नुकसान झाले. कृपाविलास गजभिये यांचे घर पडले. तसेच आठ, दहा लोकांच्या घरात पाणी कमी प्रमाणात नुकसान झाले. गोंडेगाव सरपंच नितेश राऊत व गावक-याच्या मागणी ने पोकलेंड मशीन पाठवुन जमेल तेवढी नाल्यातील माती काढुन सफाई करून साचलेल्या पाण्याची निकासी करण्यात आली. परंतु उघडयावर पडलेल्या त्या दोन घरच्या कुंटुबाला सहकार्य करण्यास वेकोलि गोंडेगाव प्रशासन आनाकानी करित असल्याने सरपंच नितेश राऊत सह गावक-यांनी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांना  समस्या सांगितल्याने बुधवार (दि. १०) सप्टेंबर ला शिवसेना माजी खा. प्रकाश भाऊ जाधव यांनी वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्रिय अधिकारी मा. ठाकरे यांच्याशी वेकोलि गोंडेगाव अतिथी गृहात चर्चा करून मानुष्कीच्या नात्याने सर्वप्रथम नुकसान ग्रस्त दोन्ही कुंटुबाना गोंडेगाव वसाहतीत राहण्याची व्यवस्था करावी, त्यांना लागणा-या जिवनापयोगी अन्य, धान्य, साहीत्याची त्वरित मदत करून सहकार्य करावे, पाऊस थांबुन उघाड झाल्यावर पाणी निकासी नाले खोल व चौडे करून गावात या नंतर पावसाचे, किंवा कोळसा खदानचे पाणी शिरू नये अशी व्यवस्था सरपंच व सदस्याच्या उपस्थित करावी. तसेच गोंडेगावातील विद्यार्थी बोरडा रोडवरील नविन गोंडेगाव येथे ने-आण करणारी वेकोलि ची स्कुल बस बंद केल्याने विद्यार्थ्या होणारे शैक्षणिक नुकासान होऊ नये म्हणुन ती बस त्वरित सुरू करावी. या समस्या त्वरित युध्द स्तरावर सोडविण्यास अधिकारी व ग्रामस्थां च्या सामोर चर्चा करून वेकोलि प्रशासनाने मान्य केले. वेकोलि प्रशासनाने व्यवस्थित गोंडेगाव प्रकल्पग्रस्था न्यायीक मागण्या समोपचाराने सोडविण्यास तयारी असेल तर उर्वरित पुर्नवर्शन ग्रामस्थ व वेकोलि अधिकारी एकत्र बसुन कित्येक वर्षाचा रखडलेला गोंडेगाव पुर्नवसनाची समस्या येणा-या तीन चार महिन्यात सोडवुन पुर्नत: गोंडेगाव चे पुर्नवसन करू असे मत यावेळी मा.जाधव साहेबानी व्यकत केले. याप्रसंगी शिवसेना माजी रामटेक खासदार प्रकाश भाऊ जाधव, दिलीपराव राईकवार, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, उदारामजी शिंगणे, कृपाविलास गजभिये, ग्रा.प.सदस्या ललिता पहाडे, शिंगणे आजीबाई, अर्चना शिंगणे, विमल शेंडे, वेकोलि गोंडेगाव खुली खदान उपक्षेत्र अधिकारी मा. ठाकरे साहेब, मँनेजर अमित चतुर्वेदी, पर्सनल मँनेजर सरोवनी मँडम, सर्वे अधिकारी विमल शर्मा, अशोक चकोले, शुभम चौरे, अनिल लोंढे सह ग्रामस्थ उपस्थित होते. वेकोलि अधिका-यांनी पहिल्यादां सकारात्मक दुष्टीने सहकार्य केल्याने सरपंच नुकसान ग्रस्तानी प्रकाश भाऊ जाधव व वेकोलि अधिका-यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

निराधार महिलांना मा.राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप

Wed Aug 10 , 2022
  निराधार महिलांना मा.राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप कन्हान,ता.10 ऑगस्ट       कोरोना काळात निराधार झालेल्या ग्रा.प.साटक व परिसरातील महिलांना स्वावलंबी करण्या करिता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिल की जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत दहा लाभार्थी महिलांना शिवणयंत्र (शिलाई मशीन) वाटप करण्यात आल्या.     […]

You May Like

Archives

Categories

Meta