कन्हान पोलीस हवालदार रविंद्र चौधरी ला जिवानिशी मारण्याचा कट :आरोपीस अटक

कन्हान पोलीस हवालदार रविंद्र चौधरी ला जिवानिशी मारण्याचा कट

#) कन्हान पोलीसांवर हल्याने अपराधी प्रवृती डोके वर काढु लागले.

#) पोलीसांना दोन आरोपीस मध्यरात्री नंतर अटक करण्यास यश.

कन्हान : – पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस हवालदार रविंद्र चौधरी हयानी अवैद्य रेती चोरी प्रकरणी रात्री भावला पो.स्टे. ला नेऊन चोप दिल्याने अपराधी प्रवृतीच्या युवकांनी गहुहिवरा चौक तारसा रोडवर पोलीसास धारदार शस्त्राने पोटावर मारून गंभीर जख्मी करून जिवानिशी मारण्याचा पर्यंत केल्याने नागपुर च्या खाजगी रूग्णालयात दाखल हवालदाराची प्रकृती चिंताजनक असुन ग्रामिण पोलीस आरोपीचा शोध घेत दोघांना अटक करण्यात आले.
बुधवार (दि.१६) ला रात्री ९ वाजता दरम्यान गहुहिवरा चौक तारसा रोड येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार रविंद्र चौधरी वय ४४ वर्ष रा खसाळा यांना दुरध्वनीवरून एम जी नगरला अनुचित प्रकार घडल्याचे सांगुन बोलाविल्याने ते जात असताना आरोपी कमलेश मेश्राम, अमन खान व साथीदाराने कट रचुन गहुहिवरा चौकात अडवुन सोमवारी रात्री रेतीचा ट्रक्टर पकडुन माझ्या भावावर प्रतिबंधक कारवाई करून मारहाण का केली ? शाब्दीक चकमक करित पाहुन चौधरी यांनी तारसा रोडकडे पळ काढला असता खंडेलवाल यांच्या घराजवळ मागुन घावुन कमलेश मेश्राम व साथीदाराने लात भुक्यानी व धारदार शस्त्राने पोटावर वार करित जबर मारहाण करून रक्त बंबाळ खाली पडल्याचे पाहुन आरोपी पसार झाले. कन्हान पोलीसाना माहीती मिळताच घटनास्थळी पोहचुन जख्मी अवस्थेत चौधरी यांना आशा दवाखाना कामठी ला भर्ती केले परंतु गंभीर जख्मी व प्रकृती चिंताजनक असल्याने नागपुर ला पाठविल्याने व्होकाड खाजगी दवाखाना नागपुर ला उपचरार्थ रात्रीच दाखल करण्यात आले असुन ते मुत्युशी झुंज देत असल्याने रात्रीच शस्त्रक्रिया करून डॉक्टरानी ४८ तास तरी प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे.
प्राप्त माहीतीवरून सोमवारी रात्री सिहोरा रेती घाटातुन वाळु चोरी करण्या-या ट्रॅक्टरवर कन्हान पोलीसांनी कार्यवाही करित कमलेश मेश्राम च्या भावाला अवैध व्यवसायाचा संशयात रात्री पो स्टे ला आणुन चोप दिली व प्रतिबंधक कारवाई करीत रात्री आरोपीचा भावाला सोडले. यात पोलीस रविंद्र चौधरी यांनीच कारवाई करून भावाला मारहाण केल्याचा रागाने बदल्याच्या भावनेतुन कट रचुन चौधरी यांच्यावर जिवानिशी मारण्याचा आरोपी कमलेश मेश्राम, अमन खान, नितेश मेश्राम, दादा मुळे यांनी पर्यंत केल्याने कन्हान पोलीसानी चार आरोपी विरूध्द ३०७, ३५३, ३३३, ३४ भादंवि ४/ २५ आरम अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करून पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजल्लवार पुढील तपास करित आहे.
पोलीस हवालदारावर प्राण घातक हल्याचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस अधिक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधिक्षक मोनीका राऊत, स्थानिय गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक अनिल जिटेवार आपल्या सहकार्यासह घटनास्थळी रात्री ११ वाजता पोहचुन सी सी टि व्ही फुटेज तपासुन आरोपीच्या शोधात पथक रवाना झाले. गुरूवार (दि १७) ला अतिरिक्त अधिक्षक मोनीका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजल्लवार, खापरखेडा थानेदार, मौदा थानेदारसह नागपुर ग्रामिण पोलीसानी आरोपीचा शोध घेत मध्यरात्री आरोपी कमलेश मेश्राम,अमन खान यास अटक करण्यास यश आले.
कन्हान चे थानेदार सुटी वर असुन त्याचे निवासस्थान तारसारोड जवळच १०० मिटर व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय ५०० मिटर वर असुन ही घटना घडुन तारसा रोडवरील गहु हिवरा चौक हा अवैद्य धंदे, असामाजिक तत्वाचे केंद्र बनु पाहत असुन पोलीसावर जर हल्ला करून जिवे मारण्याचा पर्यंत होत असामाजिक, अपराधिक तत्व डोके वर काढत अवैद्य धंदयाचा उत येत असुन रक्षकच असुरक्षित असेल तर सर्वसा मान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? अश्या चर्चा नागरिकात रंगु लागल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोरोना संक्रमणाची वाढती संख्या रोखण्याकरिता सावनेरला जनता कर्फु का नाही? 

Fri Sep 18 , 2020
कोरोना संक्रमणाची वाढती संख्या रोखण्याकरिता सावनेरला जनता कर्फु का नाही?  विजय पांडे मुख्य संपादक सावनेर : –  शहर व परिसरात कोरोना रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन रूग्णांचे मुत्यु सुध्दा होत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत कोरोना रूग्णाची वाढती संख्या रोखण्याकरिता सावनेर शहरात आठ ते दहा दिवसाचा जनता कर्फु का […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta