सावनेर मध्ये साध्यापणे घरोघारी साजरी केली भगवान महावीर जयंती

*सावनेर मध्ये साध्यापणे घरोघारी साजरी केली भगवान महावीर जयंती*

*कोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी सावनेर जैन संघ द्वारा प्रार्थना करण्यात आली*

सावनेर – सोमवारी भगवान महावीर यांची जयंती साध्यापणे घरोघरी उत्सवात साजरी केली. जैन धर्मात महावीर जयंतीचे पर्व महापर्व म्हणून मानले जाते. दरवर्षी सावनेर जैन संघातर्फे रथयात्रा काढली जाते व मूर्तिची पूजा व मोठे आयोजन केले जाते.

मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गामुळे जैन समाजातर्फे साध्या पद्धतीने भगवान महावीर यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आली आहे. जैन समाजबांधवांनी घरीच महावीरांची जयंती साजरी करावी. व सर्वानी सकाळी व सायंकाळी *”ओम श्री श्री महावीर स्वामी अर्हते नमः”* मंत्राचा जप करावा, असे आवाहन सावनेर जैन संघाचे वरिष्ठ मानमलजी सिंघवी व सौ.विमला सिंघवी यांनी केले.


*कोरोना विषाणू जगापासून दूर जाऊ दे…या करिता सायंकाळी सात वाजता पाच दीप प्रज्वलित करावेत आणि “हे देवाधिदेव, सर्वोच्च महावीर स्वामी, आपण जन्मला तेव्हा जगातील सर्व प्राण्यांना शांतता होती. नरकीच्या प्राण्यांनीसुद्धा एक क्षण शांततेचा अनुभव घेतला. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे दु:खी झाले आहे, काळजीत आहे. प्रभू, हा कोरोना विषाणू जगापासून दूर जाऊ दे आणि शांती जगावर असू दे. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या आत्म्यांचे दु:ख दूर व्हावे,’ अशी प्रार्थना देवाला करावी, असे आवाहनही सावनेर जैन संघाचे उपाध्यक्ष श्री पियूष झिंझुवाडिया यांनी केले.*

*महावीरांनी दाखवला जगाला प्रेम व शांतीचा मार्ग*

शेवटचे ( २४ वे) जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. 599 अथवा इ.स.पू. 615 मध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. भगवान महावीर यांनी तप व ज्ञानाच्या आधारे सर्व इच्छा व विकार यांच्यावर नियंत्रण मिळवले, त्यामुळे त्यांना “महावीर’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी जगाला प्रेम व अहिंसेचा मार्ग दाखवला.

*दरवर्षी होत असते सामूहिक महावीर जयंती साजरी*
पण या वर्षी कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गामुळे घरोघरीच साजरी केली ,यात सावनेर जैन सखी मंडल द्वारा आप आपल्या घरिच रंगोली स्पर्धा व नृत्य स्पर्धा आयेजित केली। व सर्व स्पर्धाकांचे मनोबल वाढवीले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलीस व्दारे कोव्हीड नियमाचे उल्लघन करणा-या दोन ट्रॅव्हल्स वर दंडात्मक कार्यवाही

Tue Apr 27 , 2021
कन्हान पोलीस व्दारे कोव्हीड नियमाचे उल्लघन करणा-या दोन ट्रॅव्हल्स वर दंडात्मक कार्यवाही #) दोन्ही ट्रॅव्हल्स धारकास प्रत्येकी १०,००० रु. असा एकुण २०,००० रू दंड थोपविण्या आला.  कन्हान : – शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे कन्हान पोलीस स्टेशन समोर व तारसा रोड चौक येथे नाकाबंदी सुरु असतां ना दोन ट्रॅव्हल्स थांबवुन […]

You May Like

Archives

Categories

Meta