सिंगारदिप,नांदगाव,जुनिकामठी व पिपरी गावाचे पुनर्वसन करा- हटवार

सिंगारदिप,नांदगाव,जुनिकामठी व पिपरी गावाचे पुनर्वसन करा- हटवार

#) पुर्व विदर्भात अतिवृष्टीने शेतक-यांचे नुकसान झाल्याने ५० हजार प्रती हेक्टर आर्थिक मदत द्या.  


कन्हान :- पुर्व विदर्भात पावसाच्या अति वृष्टीने नदीकाठाजवळील गावातील नाग रिकांच्या घराचे, उपजिवीकेच्या साधन साहित्याचे व उभ्या पिकांना जलसमाधी होऊन शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानीचे सर्वे करून प्रति हेक्टर ५० हजार रू.ची मदत करून सिंगारदिप, नांदगाव, जुनिकामठी , पिपरी या चार गावाचे पुनर्वसना करिता मा. उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री यांना साकडे घालण्यात आले. 

      या पावसाळयात पुर्व विदर्भात झाले ल्या अतिवृष्टी पावसाने मध्य प्रदेशातील चौराई धरण भरून पाणलोट क्षेत्राच्या पा ण्याने तोतलाडोह व पेंच धरण तुडुंब भरून धरणाचे पुर्ण दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग एकाएक केल्याने पेंच व कन्हान नदीला महापुर येऊन नदी काठावरील गावाचे घरे, जिवनाश्यक साधन साहित्य पुरात बुडुन किवा वाहुन जावुन तसेच परिसरातील शेत पाण्यात बुडुन तुर, का पुस, मिरची, सोयाबीन,भाजीपाला या उभ्या पिकांना जलसमाधी झाल्याने शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यास्तव अतिवृष्टी व पुरपरिस्थिती चे सर्वे करून ५० हजार रू प्रति हेक्टर, पडलेले घर व साधन साहित्याचे पंचनामे करून पुरग्रस्ताना तातडीने आर्थिक मद त देण्यात यावी. तसेच नांदगाव लगत खापरखेडा औष्णिक विधृत केंद्राच्या राख तलाव बनल्याने, जुनिकामठी हे कोलार-कन्हान-पेंच नदीच्या त्रिवेणी संगमा जवळ असल्याने, पिपरी ला लागुनच वेकोलि कामठी खुली कोळसा खदानच्या माती डम्पींग कृत्रिम टेकडयामुळे आणि नदीकाठावरील सिंगारदिप गावाला २६ वर्षानतर पहिल्यादां पेंच व तोतलाडोह धरणाच्या एकाएक पाण्याच्या विसर्गाने आलेल्या महापुराने चारही गावातील घरे, जिवनाश्यक वस्तु, साहित्य व शेतपिक बुडुन, वाहुन गेल्याने लोकांचे भयंकर नु कसान झाले आहे. भविष्यात अतिवृष्टी किंवा मध्य प्रदेशातील पाणलोटाने पेंच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने नुकसान होऊ नये म्हणुन या चारही गावाचे सरकारने तातडीने पुनर्वसन करावे. जेणे करून नागरिकांची मालमत्ता, शेतपिकाचे व जीव हानी होणार नाही. अशी आग्रही लोकहितार्थ न्यायीक मागणीचे निवेदन मा उध्दवजी ठाकरे मुख्य मंत्री महाराष्ट्र हयांना विभागीय आयुक्त नागपुर व उपजिल्हाधिकारी नागपुर यांच्या मार्फत मा. विजय हटवार राष्ट्रीय संघटन मंत्री नमो नमो मोर्चा भारत, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हयांनी पाठवुन केली आहे. शिष्टमंडळात पुर्व विदर्भ प्रांताध्यक्ष विशालजी भोसले, प्रदेश सचिव पुरुषोत्तम खेरगडे, नागपुर शहर महिला प्रभारी नमिता चोपकर, उपाध्यक्ष नागपुर शहर चंद्रहास अनवाने व गंगाधर महाजन प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात नविन २० रूग्णाची भर   

Wed Sep 9 , 2020
कन्हान परिसरात नविन २० रूग्णाची भर  #) कन्हान ११,कांद्री २, निलज २, नयाकुंड २, टेकाडी, सिंगोरी, लापका असे २० मिळुन कन्हान ४७८   कन्हान : –  कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १२२ लो कांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत कन्हान चे १०, कांद्री […]

You May Like

Archives

Categories

Meta