लाकडी दंड्याने मारहाण करून केले जख्मी

 

 

लाकडी दंड्याने मारहाण करून केले जख्मी

कन्हान,ता.30 जुलै

पोलीस स्टेशन हद्दीत खेडी (खोपडी) शिवारात दोन युवकांनी   फिर्यादी व त्याचा लहान भावाला व मोठ्या भावा च्या पत्नी ला लाकडी दंड्याने पायावर व हातावर मारहाण करून जख्मी केल्याने  कन्हान पोस्टे ला दोन्ही आरोपी  विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे.
पोलीसांच्या माहिती नुसार उमेश पुडंलिक वैद्य वय ५३ वर्ष राह. खेडी (खोपडी) यांची खेडी शिवारात ३ एकर शेती असुन त्या शेती मध्ये तीन भाऊ व दोन बहीणी असे हिस्से आहे. शेती उमेश वैद्य सह सर्व मिळुन करित असुन त्यांच्या शेताच्या बाजुला १) संतोष ज्ञानेश्वर काळे, २) मंगेश ज्ञानेश्वर काळे यांची शेती लागुन आहे. या शेती बाबद कोर्टात केस सुरू आहे. पण शेतीचे ७/ १२ वर उमेश वैद्य यांचे सह पाचही भाऊ बहिणेचे नावावर असुन ते शेती करतात. मंगळवार (दि.२६) जुलै ला दुपारी १२:४५ वाजता दरम्यान उमेश वैद्य सह सर्व मिळुन शेतीचे काम करण्याकरिता आपल्या शेतात गेले असता संतोष काळे व मंगेश काळे दोन्ही राहणार खेडी (खोपडी) यांनी उमेश वैद्य व त्याच्या लहान भाऊ नामदेव आणि मोठ्या भावाची पत्नी नामे आशा दिलीप वैद्य यांना लाकडी दंड्याने पायावर व हातावर मारहाण करून जख्मी केले.  शिवीगाळ करित पुन्हा या शेतावर काम करित दिसल्यास सर्वांना जिवाने मारून टाकु अशी धमकी दिली. उमेश वैद्य यांना व त्यांच्या बहीण भावाला दोन्ही आरोपी पासुन जिवितास धोका असल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी उमेश वैद्य यांच्या तोंडी तक्रारीवरून  संतोष ज्ञानेश्वर काळे व  मंगेश ज्ञानेश्वर काळे यांच्या विरुद्ध अप क्र. ४४३/२२ कलम ३२४, ५०६ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन  पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शना त  पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

विज पडुन शेतकरी दीपक महल्ले चा मुत्यु

Sat Jul 30 , 2022
विज पडुन शेतकरी दीपक महल्ले चा मुत्यु कन्हान, ता.30 जुलै    एसंबा (सालवा) शेतातील बांधीत दोघे काम करताना एका एक जोरदार पाऊस येण्या अगोदर जोराच्या कडाक्या सह अंगावर विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला.  शनिवार (दि.३०) जुलै ला दुपारी कन्हान परिसरात जोरदार विज गर्जेनेसह पाऊस आल्याने मौदा […]

You May Like

Archives

Categories

Meta