काळा आवाक परदेशी पक्ष्याला दिले जिवनदान वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहुउद्देशीय संस्था व वनविभागाची कामगिरी

काळा आवाक परदेशी पक्ष्याला दिले जिवनदान

वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहुउद्देशीय संस्था व वनविभागाची कामगिरी

कन्हान,ता.०६ जून

    वाघधरे वाडी येथे उप-सहारा आफ्रिकेतील पक्षी काळा आवाक(हॅडेडा आयबिस ) करंट लागल्याने जख्मी अवस्थेत आढळल्याने सुजान नागरिकांनी वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहु उद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन वन विभागाच्या स्वाधिन करून पक्ष्या विषयी असलेली आपुल की व जागृकता दाखवित परदेशी पक्ष्याला जिवनदान दिले.

       पारशिवनी तालुक्यातील वाघधरे वाडी, कन्हान येथे रविवार (दि.४) जुन ला काळा आवाक (hadada ibis) नावाचा एक वेगळा पक्षी आढळला. तेथील सुजान नगरिक अर्जुन पात्रे, राहुल उके यांनी तो पक्षी करंट लागुन खाली पडला अशी माहिती वाईल्ड लाइफ ॲनिमल अँड नेचर रेसक्यु बहु उद्देशीय संस्था यांना दिली. संस्था सदस्यांनी वन विभागला कळविले व त्यांनी लगेच घटनास्थळी पोहचुन त्या पक्षाची माहिती घेतली. तो पक्षी जखमी झाला असुन त्याला चालने सुद्धा अवघड झाले होते. त्याचवेळी तेथे वन विभागाचे वनरक्षक अनिता काठकाडे मॅडम, आशिष महल्ले, तसेच वाईल्ड ॲनिमल ॲन्ड नेचर रेसक़्यु बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य राम जामकर, राजकुमार बावने यांनी घटनेची माहिती घेऊन त्या पक्षाला पुढील उपचारा साठी वन विभागाच्या स्वाधिन करण्यात आले. वन विभाग नागपुर येथील टी टी सी सेंटर येथे पक्षाला दोन दिवस औषधोपचार करून व्यवस्थित झाल्या ने मंगळवार (दि.६) जुन ला काळा आवाक या परदेशी पक्ष्याला जंगलात सोडण्यात आले आहे.

काळा आवाक परदेशी पक्ष्याची माहिती

     हॅडेडा आयबिस (बॉस्ट्रिचिया हॅगेडाश) हे मुळचे उप-सहारा आफ्रिकेतील एक आयबीस आहे. फ्लाइट मध्ये उच्चारल्या जाणार्‍या तीन ते चार नोट कॉल्ससाठी हे नाव देण्यात आले आहे. विशेषत: सकाळी व संध्याकाळी जेव्हा ते उड्डाण करतात किंवा त्यांच्या झाडांवर परततात. जरी काही आयबिसेस प्रमाणे पाण्या वर अवलंबुन नसले तरी ते ओल्या जमिनीजवळ आढळतात आणि बहुतेकदा मानवांच्या जवळ राहतात. लागवड केलेल्या जमिनी आणि बागांमध्ये चारा करतात. कडक पाय व सामान्य खालच्या वक्र बिलासह मध्यम आकाराचे आयबिस, पंखांचे आवरण हिरव्या किंवा जांभळ्या रंगाच्या चमकाने इंद्रधनुषी असतात. ते स्थलांतरित नसले तरी पावसाला प्रतिसाद म्हणुन विशेषतः दुष्काळात भटक्या चळवळी करण्यासाठी ओळखले जातात. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या श्रेणीं मध्ये वृक्षाच्छादित वाढ आणि मानवी बदललेल्या अधिवासां मध्ये सिंचन वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोळसा खदान नं.६ ला गोळीबार करणारे आरोपी फरार 

Tue Jun 6 , 2023
कोळसा खदान नं.६ ला गोळीबार करणारे आरोपी फरार कन्हान,ता.०६ जून      परिसरातील कोळसा खदान नं.६ येथे काही तरुणांनी गोळीबार करून घटनास्थळा वरून बंदुक घेऊन फरार झाले. तर पोलीसांनी घटनास्थळा वरून गोळीबारातील एक काढतुस ची पितळी खाली केस मिळुन आल्याने संशयित चिंटु राजपुत व बल्लन गोस्वामी व त्यांच्या साथीदारावर गुन्हा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta