एसडीओ सवंगपते व्दारे शेतात विजे पडुन मृत महिलेच्या मुलांना दोन सायकल भेट

 

एसडीओ सवंगपते व्दारे शेतात विजे पडुन मृत महिलेच्या मुलांना दोन सायकल भेट

 

 उपविभागीय अधिकारी रामटेक मा. वंदना सवंगपते च्या वतीने सायकल व आर्थिक मदत

कन्हान,ता.15 ऑगस्ट

  निलज (खंडाळा) शेत शिवारात विज पडुन शेतमजुर नंदाबाई खंडाते चा मृत्यु झाल्याने शासना तर्फे आर्थिक मदत करण्यात तर आलीच, त्याच प्रमाणे रामटेक उपविभागीय अ़धिकारी मा.वंदना सवंगपते यांनी मानुष्की जपत मृत महिलेच्या दोन्ही मुलांना सायकल भेट दिली तर दुसरी जख्मी महिला रेखा चौधरी हिला सुध्दा आर्थिक मदत करून भारताचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.


सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला भारतीय ७५ वा स्वातंत्र्या अमृत महोत्सव कार्यक्रम उपविभागीय कार्यालयात थाटात साजरा करित दुपारी १ वाजता पारशिवनी तालुक्यातील निलज (खंडाळा) ग्राम पंचा यत येथे छोटे खानी क्रार्यक्रम घेऊन गुरूवार (दि.४) ऑगस्ट ला निलज शेत शिवारात विज पडुन मृत्यु झालेल्या शेतमजुर नंदाबाई रामकृष्णा खंडाते यांच्या मुलगा तन्मय रामृष्णा खंडाते व आयुष रामकृष्ण खंडाते याना दोन सायकल भेट दिली तर जख्मी महिला रेखा मुकेश चौधरी हिला सुध्दा आर्थिक मदत करून अधिकां-याना सुध्दा माणुष्कीचे काळीज असते, अधिकारी सुध्दा समाजातील घटक असतो ते या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनी प्रत्यक्ष कार्यातुन प्रगट केले. याप्रसंगी मा.वंदना सवंगपते उपविभागिय अधिकारी रामटेक, मा.प्रशांत सांगोडे तहसिलदार पारशिवनी, मा.व्यकटराव कारोमोरे सदस्य जि.प.गोंडेगाव-साटक सर्कल, नरेश मेश्राम पं.स.सदस्य, आशाताई पाहुणे सरपंचा निलज, पंकज टोहणे उप सरपंच, रामेश्वर चरडे ग्रा.प.सदस्य, कवडु खंडाते ग्रा.प.सदस्य, धनराज चकोले ग्रा.प सदस्य, सुर्यकांता चकोले ग्रा.प.सदस्या, निताबाई पाहुणे ग्रा.प. सदस्या, मनोज कटारे ग्रामसेवक, जयराम मेहरकुळे, रामकृष्णा खंडाते, भिमराव शिंदेमेश्राम, मुलचंद खंडाते, रोशन पाहुणे, मनोज टोहणे, नागेश्वर कारेमोरे सह बहु संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
रामटेक उपविभागीय अ़धिकारी मा.वंदना सवंगपते व तहसिलदार मा. प्रशांत सांगोडे यांचे या मौलिक कार्याबद्दल ग्रा प निलज (खंडाळा) सरपंचा आशाताई पाहुणे व उपसरपंच पंकज टोहणे, सर्व ग्राम सदस्य आणि ग्रामस्थानी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आयएमए सावनेर येथे ध्वजारोहण

Tue Aug 16 , 2022
आयएमए सावनेर येथे ध्वजारोहण सावनेर : 75 व्या स्वतंत्र्य दिना . निमित्त आयएमए शाखा सावनेर येथे आय एम ए चे अध्यक्ष डॉ . उमेश जीवतोडे व सचिव डॉ . विलास मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या प्रसंगी डॉ चंद्रकांत मानकर , डॉ . निलेश कुंभारे , डॉ . […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta