आज महाशिवरात्री महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

आज महाशिवरात्री महोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान,ता.१७ फेब्रुवारी

     पारशीवनी तालुक्यातील ग्रामीण भागात महाशिवरात्री महोत्सव विविध कार्यक्रमा सह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने या वर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जुनी कामठी कामठेश्वर महादेव मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम

जुनी कामठी येथील कामठेश्वर महादेव मंदिरात श्री शिव मंदिर देवस्थान समिति द्वारे महाशिवरात्रि महोत्सव निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि.१८) फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता पासून “अखंड रामायण” आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री उत्सवा निमित्त पहाटे ३ वाजता पासून श्री भगवान कामठेश्वर महादेवाला मा.प्रकाशजी सिरीया , मा.जयरामजी पारवानी यांच्या हस्ते अभिषेक करुन दर्शनाला सुरुवात होणार आहे.

     रविवार (दि.१९)फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता केजाजी महिला भजन मंडळ, जुनी कामठी द्वारे गोपाल काला, सकाळी १०:३० वाजता ह.भ.प. उमेश महाराज बहुरूपी (वरुड) यांचे कीर्तन कार्यक्रम, सकाळी ११:०० वाजता श्री शिव मंदिर देवस्थान समिति द्वारे आभार प्रदर्शन आणि दुपारी १ वाजता ते रात्री ९ वाजता पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शिव मंदिर देवस्थान समिती द्वारे करण्यात आले आहे.

 

ग्रा.पं.वराडा येथे महाशिवरात्री महोत्सव निमित्य तीन दिवसीय कार्यक्रम

       जय शिव भोले पंच कमेटी वराडा द्वारे महाशिवरात्री महोत्सव निमित्य तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवार (दि.१८) फेब्रुवारी सकाळी शिव महापुजन, भजन कार्यक्रम, दुपारी १२ वाजता शिवगौरी भजन मंडळ वराडा, दुपारी ३ वाजता हरीपाठ भजन मंडळ वराडा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    रवीवार (दि.१९) फेब्रुवारी दुपारी १२ वाजता शारदा महिला भजन मंडळ वराडा, दुपारी ३ वाजता बाल गणेश भजन मंडळ वराडा, सायंकाळी ८ वाजता शिव भजन मंडळ वराडा, शिव भजन मंडळ वराडा तर्फे जागृती भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार (दि.२०) फेब्रुवारी दुपारी १ वाजता ते ३ वाजता पर्यंत ह.भ.प.सौ.सोनुताई भोले नरसाळा, ह.भ.प.श्री लोडेकर महाराज यांच्या किर्तन व गायक कार्यक्रम, दुपारी ३ वाजता दहिकाला व सायंकाळी ४ वाजता भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जय शिव भोले पंच कमेटी व समस्त गावकऱ्यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सत्तर गोवंश ला कन्हान पोलीसांनी दिले जीवदान   गोवंश सह एकुण ६,५६,००० रु. मुद्देमाल जप्त

Sat Feb 18 , 2023
सत्तर गोवंश ला कन्हान पोलीसांनी दिले जीवदान  गोवंश सह एकुण ६,५६,००० रु. मुद्देमाल जप्त कन्हान,ता.१७ फेब्रुवारी      पोलीस स्टेशन हद्दीतील सिहोरा शिवारात गोपाल नथ्थुजी कुंभलकर यांच्या शेतात ७० गोवंश मिळुन आल्याने पोलीसांनी एकुण ६,५६,००० रु. मुद्देमाल जप्त करुन गोवंश ला जीवनदान देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल‌ केला आहे.   […]

You May Like

Archives

Categories

Meta