2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास

नजर चुकवित 2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास

 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये बॅग पळवितांनी चोरटा
सावनेर ता : सावनेरच्या मध्यभागी गजबजलेली असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोर दोन तरुण इसमाचे 2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना सावनेर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश छत्रपाल रहाटे व रजत रामराव रहाटे दोन्ही रां मंगसा,हे दोघेही सावनेर नजीक असलेल्या मंगासा गावातून 2 लाख 70 हजार रुपये घेऊन स्थानिक स्टेट बँक सावनेर येथे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आले असता पैशाने भरलेली बॅग मोपेड दुचाकीच्या  हांडेललाच होती. गाडीतून उतरताच कोणीतरी अंगावर काहितरी टाकल्याचे लक्षात आले व हात व मानेला खाजवायला सुरुवात केली असतात दरोडेखोरांनी पैशाने भरलेली पिशवी लंपास केली. रुपेश व रजत यांना लक्षात येण्या अगोदरच चोरटा पळून गेला त्याचा शोधाशोध करून सुद्धा तो वृत्त लिहीपर्यंत पोलिसांना मिळाला नाही परंतु काही मुख्य मार्गावरील   सीसीटीव्ही फुटेज बघितले असता दुकाना समोरून हातात लाल कलरची पिशवी घेऊन पळत असल्याचे निदर्शनात आले यावरून चोरटा हा बसस्थानकाच्या दिशेने निघाला असे लक्षात येताच पोलीस निरीक्षक यांनी संपूर्ण पोलीस ताफा  चोरट्याला शोधण्यास लावला. पो.नि.मूलूक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिपक करांडे , पोलीस शिपाई प्रकाश खोके, निलेश तायडे, दिनेश घाडगे पुढिल तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा

Thu Jul 22 , 2021
मंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा. सावनेर ता :मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमाजान ईद आणि बकरी ईद. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा, असेही संबोधले जाते. ईद-उल-फितरनंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta