विष्णु भरडे शिक्षकाने दारुच्या नशेत घेतला गळफास 

विष्णु भरडे शिक्षकाने दारुच्या नशेत घेतला गळफास

कन्हान,ता.२७ जुलै

     गणेश नगर, कन्हान येथिल रहिवासी शिक्षक मृतक विष्णु भरडे याने राहत्या घरी दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीसांनी बंडु भरडे यांचा तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांच्या माहिती नुसार, बंडु केशव भरडे (वय ४३) रा.आंबोली ता.चिमुर, जि.चंद्रपुर हे तिघे भाऊ बंडु भरडे, राजु भरडे, विष्णु भरडे आणि बहीण सौ.शारदा ननावरे सर्व विवाहित असुन आप आपल्या परीवारा आनंदाने सोबत राहतात. विष्णु केशव भरडे (वय ३५ ) रा.गणेश नगर, कन्हान रहिवासी असून मागिल ८ वर्षापासुन दखने हायस्कुल कन्हान येथे शिक्षक म्हणुन कार्यरत होता. गुरवार (दि.२७) जुलै सकाळी ७.३० वाजता दरम्यान कन्हान पोलिसांना राजु भरडे यांनी फोन करून विष्णु भरडे यांनी राहत्या घरी गळफास  घेतल्याची माहिती दिली.

    मृतक विष्णुचा दारू पिण्याच्या सवयिला कंटाळून पत्नी माधुरी विष्णु भरडे (वय ३०) त्यांचा राहत्या घरून मुलगी कु.हिरा (वय ४) हिला घेऊन मागिल चार ते पाच दिवसापुर्वी तिचा माहेरी बेलगाव ता.भद्रावती, जि.चंद्रपुर येथे निघुन गेली. विष्णु भरडे दारू पिण्याच्या सवयिचा आहारी गेल्याने त्याने दारूच्या नशेत गळफास लावला असावा अशी पोलीसांना‌ माहीती दिली. त्याचा मरणाबाबत बंडु भरडे यांना कोणावरही शंका, संशय नसल्याने कन्हान पोलीसांना बंडु भरडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग क्रमांक ३१/२३ कलम १७४ जा. फौ गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तालुक्यातील खंडाळा(घ) येथे अतिवृष्टी मुळे पिकाचे मोठे नुकसान

Thu Jul 27 , 2023
तालुक्यातील खंडाळा(घ) येथे अतिवृष्टी मुळे पिकाचे मोठे नुकसान कन्हान,ता.२७    नागपूर जिल्हातील व पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घटाटे भागात (दि.२६) जुलै रोजी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने सोयाबीन, कापूस, तूर, धान व इतर पिकाचे नुकसान झाले व सोबतच जमीन खरवडून गेली आहे. गेल्या २४ तासात १४२ mm पाऊस झाल्याची सरकारी विभागात […]

You May Like

Archives

Categories

Meta