तालुक्यातील खंडाळा(घ) येथे अतिवृष्टी मुळे पिकाचे मोठे नुकसान

तालुक्यातील खंडाळा(घ) येथे अतिवृष्टी मुळे पिकाचे मोठे नुकसान

कन्हान,ता.२७

   नागपूर जिल्हातील व पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घटाटे भागात (दि.२६) जुलै रोजी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने सोयाबीन, कापूस, तूर, धान व इतर पिकाचे नुकसान झाले व सोबतच जमीन खरवडून गेली आहे. गेल्या २४ तासात १४२ mm पाऊस झाल्याची सरकारी विभागात नोंद घेतली आहे. अतिवृष्टीची सूचना कृषी विभागाला देण्यात आलेली आहे.

   माहिती होताच जिल्ह्याचे कृषि अधीक्षक रवींद्र मनोहरे तात्काळ नुकसान ग्रस्त ठिकाणी स्वता: जाऊन पाहणी केली आणि झालेल्या नुकसानाची सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहे. या वेळी संजय सत्येकार शेतकरी नेते, सुरज शेंडे तालुका कृषी अधिकारी, चेतन कुंभालकर उपसरपंच, कृषी मीत्र प्रफुल नागपुरे, विवेकानंद शिंदे कृषी सहायक व इतर शेतकरी सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश

Thu Jul 27 , 2023
स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश कन्हान,ता.२७ जुलै     नगर परिषद कन्हान-पिपरी क्षेत्रात आनंदधाम बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, रामटेक व नगर परिषद कन्हान-पिपरी यांच्या संयुक्त विद्यामानाने नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर व लक्ष्मणराव मेहर व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत यांच्या नेतृत्वात स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता संदेश देणारी प्रभात […]

You May Like

Archives

Categories

Meta