गोंडेगाव येथील शेतात उभी असलेली ई दुचाकी जळून खाक

गोंडेगाव येथील शेतात उभी असलेली ई दुचाकी जळून खाक


कन्हान,ता.१६ डिसेंबर

     वेकोली कोळशा खदान येथील गोंडेगाव कॉलनी जवळील मैदानात उभी असलेली दुचाकी वाहन जळून खाक झाली.

    ही घटना बुधवारी सकाळी ही घटना घडली असुन पोलिसांच्या माहितीनुसार, कन्हान पोलिस स्टेशन हदीतील कोळसा खदान, वेकोली कॉलनीत राहणारे वेकोली कर्मचारी लहू रोकडे यांनी आपली इलेक्ट्रिक दुचाकी क्र. MH 40CJ 8439‌  वरुन शेतात वर पोहोचले. आणी दुचाकी वाहन पार्क करून लहू रोकडे शेतात होते. काही वेळानंतर पार्क केलेली दुचाकी वाहनातून अचानक धूर येऊ लागला.

दुचाकीवरून धूर निघत असल्याचे पाहून मैदानावरील इतर लोकांनी लहू रोकडे यांना बोलवण्या करीता आरडाओरडा केला. रोकडे त्यांच्या दुचाकीजवळ पोहोचले तोपर्यंत दुचाकी आगीच्या काही, वेळातच जळून खाक झाली. लहू रोकडे यांनी 15 जानेवारी रोजी मुलगा विनीत साठी 1 लाख. 80 हजार रुपयांची इलेक्ट्रीक ई-बाईक खरेदी केली होती. या घटनेची लेखी माहिती लहू रोकडे यांनी कन्हान पोलिसांना दिली. तक्रारीवरून पो.‌अधिक तपास करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

छत्तीसगड च्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता

Fri Dec 16 , 2022
छत्तीसगड च्या कुम्हाली संघ स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी. कन्हान,ता.१६ डिसेंबर    वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta