विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा

विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण कार्यक्रम

भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा

कन्हान,ता.२७ जानेवारी.    

     भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन कन्हान परिसरात शासकिय कार्यालय, शाळा, कनिष्ट महाविद्यालय, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला.

 स्वामी विवेकानंद ट्रस्ट व ग्रामौन्नती प्रतिष्ठान 

    स्वामी विवेकानंद ट्रस्ट व ग्रामौन्नती प्रतिष्ठान कन्हान चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव यांच्या घराच्या प्रांगणात नथुजी चरडे व मेहरकुळे ताई यांच्या हस्ते भारत माता व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून मा.एकनाथजी खडसे सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे, ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीरा म रहाटे, जेष्ट पत्रकार अजय त्रिवेदी, कमलेश पांजरे, अखिलेश मेश्राम आदीने मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करित आहोत. महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन ६२ वर्षे झाली आहे तरी सुध्दा ग्राम सुराज्य प्रत्यक्ष बहाल झाले नाही आहे. आज ही गावात मुलभुत गरजा ची परिपुर्णत: झालेली नाही. लोकशाहीने सर्वाना स्वतंत्र बहाल केले असले तरी सर्व सामान नागरिक जो पर्यंत मुलभुत गरजा पुर्ण करण्या करिता जागुन उठत नाही तोपर्यंत खरे सुराज्य प्रस्तापित होऊ शकत नाही. यास्तव गाव व ग्रामस्थाच्या न्याय हक्का करिता ग्राम स्वराज्य ची संकल्पना हाती घेऊन ग्रामौन्नती प्रतिष्ठान व्दारे ग्राम स्वराज्याचा लढा गावोगावी उभा करणार असे स्वामी विवेकानंद ट्रस्ट व ग्रामौन्नती प्रतिष्ठान कन्हान चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांनी आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनातुन संबोधन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रविंद्र चकोले यांनी तर आभार प्रविण गोडे यांनी व्यकत केले. कार्यक्रमास ताराचंद निंबाळकर, दिलीप राईकवार, विजय डोणेकर, रज्जाक भाई, चंद्रशेखर कळमदार, विनायक वाघधरे, नानेश्वर राजुकर, अशोक हिंगणकर, गोविंद जुनघरे, कोठीराम चकोले, भगवानदास यादव, अकरम कुरेशी, प्रदीप वानखेडे, नेवालाल पात्रे, कमल यादव, सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर, रवी दुपारे, किशोर वासाडे, निलेश गाढवे, केतन भिवगडे, देवा चतुर, अमोल सुटे, सोनु कुरडकर, फजित खंगारे, जीव न ठवकर, रूपेश सातपुते, बंटी हेटे, प्रतिक जाधव, संजय शेंदरे, शेषराव बावने, सतिष भसारकर, दिपचंद शेंडे, रंजनिश मेश्राम, रोहीत मानवटकर, मनोज गुडधे, प्रशांत येलकर, प्रविण माने, निशांत जाधव, कृष्णा केजरकर, अवचट ताई, कावळे ताई, खंडार ताई, येलकर ताई, नितु तिवारी, भोयर ताई सह बहुसंखेने प्रतिष्ठीत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

यशवंत विद्यालय वराडा

      गुरूवार (दि.२६) जानेवारी २०२३ ला यशवंत विद्यालय वराडा येथे संस्थेचे अध्यक्ष मा भुषण निंबा ळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी माजी उपसभाप ती देवाजी शेळके, वराडा सरपंच सौ विद्या चिखले, शिक्षक पालक संघ अध्यक्ष रविंद्र टाले, सहसचिव कवडुजी पारधी, ग्रा प सदस्य संजय टाले, मुख्याध्या पिक कीर्ती निंबाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कु तेजस्वीनी काठोके, प्रतिक्षा धोटे या विद्याथीं नी प्रजासत्ताक दिनाचे भाषण केले. तदंतर शाळेत घेण्यात आलेल्या वर्ग सजावट, विज्ञान प्रदर्शनी, क्रिडा स्पर्धा, आंनद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मान्य वरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या यशस्वितेकरिता अर्चना शिंगणे मॅडम, ठाकरे मॅडम, मुंगले मॅडम, राजेंद्र गभणे सर, राकेश गणविर, सतिश कुथे, रोशन राऊत, मोतीराम रहाटे, दिपक पांडे आदीने सहकार्य केले.

काँग्रेस कमेटी कन्हान शहर

कन्हान शहर काँग्रेस कमेटी द्वारे ७४ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य गांधी चौक कन्हान येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष मा.दयाराम भोयर, प्रमुख अतिथी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा.राजेश यादव यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा हस्ते ध्वजारोहण करुन तिरंगा झेंडा ला सलामी देऊन आणि राष्ट्रगीत गायन करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी युवक काँग्रेस अध्यक्ष कन्हान शहर आकिब भाई सिद्दीकी, नगरसेविका कल्पनाताई नितनवरे, रविभाऊ रंग, प्रमोद बांते, डॉ.प्रकाश बोंन्द्रे, डॉ.शुभांगी बोंन्द्रे, देवचंद चकोले, धर्मपालजी बागडे, सिद्धार्थ ढोके, किसन राऊत, विनायकराव वाघधरे, श्याम पिपलवा, नंदलाल यादव, सतिश भसारकर, उमेश यादव, दिनेश ढोके, अविनाश रायपुरे सह पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सलील देशमुख हस्ते शा.राजेंद्र बावनकुळे यांच्या सत्कार

Wed Feb 1 , 2023
सलील देशमुख हस्ते शा.राजेंद्र बावनकुळे यांच्या सत्कार नागपूर,ता.०१ फेब्रुवारी       मकर संक्रांत महोत्सव निमित्त पंचक्रोशी हनुमान देवस्थान सोनेगाव (रिठी) येथे भव्य ग्रामीण स्तरावर महिला व बाल भजन स्पर्धा व सुखदास गाडेकर महाराज पाटसूल यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.     यावेळी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व गावातील लोकांनी सहभाग […]

You May Like

Archives

Categories

Meta