जय जवान जय किसान संघटनेच्या आंदोलनाला यश बेकायदेशीर महामिनरल कोल वॉशरीला लावले कुलुप. 

जय जवान जय किसान संघटनेच्या आंदोलनाला यश

बेकायदेशीर महामिनरल कोल वॉशरीला लावले कुलुप.

कन्हान,ता.२३ डिसेंबर ( सुनिल सरोदे)

      पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव वेकोली हद्दीतील वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लिमिटेड कोल वाॅशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आला‌ होता.

कोल वॉशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खदान व इतर खदान येथुन येणा-या कोळस्याला वॉश करण्यात येत असल्याने या मधून उडणा-या कोळसाच्या धुरा मुळे वराडा, एंसबा, वाघोली व घाटरोहणा मौजा येथील ६०० एकरावर शेती प्रदुषीत झाली. कोळसा धुर मीश्रीत पाण्यामुळे जमिनीचे पाणी सुध्दा प्रदुषित झाले आहे. धुळ-कणामुळे गावक-यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने बंद नोटिस दिल्या नंतरही कंपनी बंद करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ कंपनीची मदत करीत असल्याचे दिसुन येत आहे. आज-उद्या बैठक घेऊन विषय मार्गी लावु असे सातत्याने आश्वासन दिले जात होते. यामुळे त्रस्त झाल्यालेल्या शेतकरी व जय जवान जय किसान संघटनेने कोल वॉशरी समोर शुक्रवार (दि.२३) डिसेंबर २०२२ रोजी कोल वॉशरी बंद करण्यासाठी आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अशोक करे यांना फोन वर चर्चा करून कोल वॉशरी तात्काळ बंद करून कंपनी ला कुलुप ठोकावे अशी मागणी रेटून धरली. यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रविण दराडे यांच्या सोबत फोन वर चर्चा करून बेकायदेशीर सुरू असलेली कोल वॉशरी ताबडतोब बंद करावी अन्यथा बेमुदत आंदोलन करू असे ठणकावले. प्रशासनाने‌ मागणी मान्य करीता पोलिस बंदोबस्तात कंपनीला कुलुप लावले. याप्रसंगी जय जवान जय किसान संघटना अध्यक्ष प्रशांत पवार व माजी मंत्री सुनिल केदार यांनी प्रशासना सोबत फोन वर चर्चा केली. यापुढे ही बेकायदेशीर कोल वॉशरी सुरू झाल्यास पुन्हा मोठे जन आंदोलन उभे करू व याची जबाबदारी प्रशासनाची असेल असे सांगण्यात आले. आंदोलनात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांतजी पवार व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, माजी मंत्री व आमदार सुनिल केदार, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जिल्हा सचिव अविनाश गोतमारे, वराडा सरपंच विद्याताई चिखले, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, सभापती देविदास जामदार, सदस्य सीताराम भारद्वाज, जय जवान जय किसान संघटना सचिव अरूण वनकर, अभिनव फटिंग, सहसचिव निलिकेश कोल्हे , पं स सभापती मंगलाताई निबने, उपसभापती करूणा भोवते, घाटरोहणा सरपंच मिनाक्षी बेहुने, उपसरपंच अशोक पाटिल, कॉग्रेस तालुकाध्यक्ष दयाराम भोयर , माजी उपसभापती देवाजी शेळकी, रामभाऊ ठाकरे, पुरणदास तांडेकर, श्रीराम नांदुरकर, सतिश भसारकर, शरद वाटकर, वैशाली नाकतोडे सह वराडा व घाट रोहणा सर्व गट ग्राम पंचायत सदस्य, कांग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, माजी जि.प.अध्यक्षा रश्मीताई बर्वे सह परिसरातील शेतकरी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कंपनी च्या सुरक्षेच्या दुष्टीने कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान, कन्हान ठाणेदार विलास काळे यांच्या सह पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शीदें सरकार असतांना सामान्य शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी जेल  पोलीस प्रशासन शेतकऱ्यांचे नसुन कंपनीचा मालकीचे 

Mon Dec 26 , 2022
शीदें सरकार असतांना सामान्य शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी जेल पोलीस प्रशासन शेतकऱ्यांचे नसुन कंपनीचा मालकीचे कन्हान दि.२५ डिसेंबर    गुप्ता कोळ वसारीसमोर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी (दि.२५) डिसेंबर ०२२ रोजी शनिवार रात्री ताब्यात घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासून पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.   पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव वेकोली लगत वराडा व मौजा […]

You May Like

Archives

Categories

Meta