डुमरी अण्णा मोड च्या नहरात डुबुन ट्रक क्लीनर सागर यादव युवकाचा मुत्यु  

डुमरी अण्णा मोड च्या नहरात डुबुन क्लीनर सागर यादव युवकाचा मुत्यु

कन्हान : – डुमरी अण्णा मोड येथील नहरा जवळ शौच्छास गेलेल्या ट्रक चा क्लीनअर सागर यादव या युवकाचा नहरात डुबुन मुत्यु झाला. 

      प्राप्त माहीतीनुसार शितला माता मंदीर कामठी रहिवासी सागर उर्फ सोनु प्रताप यादव वय २३ वर्ष हा सोमवार ला सकाळी १० वाजता घरून कामावर जातो म्हणुन निघाला. हा ट्रक वर क्लीनअर चे काम करित असुन ट्रक डुमरी अण्णा मोड जवळ नादुरूस्त झाल्याने  मंगळवार (दि.२८) जुलै २०२१ ला १०.३० वाजता दरम्यान क्लीनअर डुमरी अण्णा मोड जवळील नहारा कडे शौच्छास गेला होता. नहरात कुणीतरी बुडा ल्याचे महिलाने ओरडल्याने ट्रक ड्रायव्हर तेथे जावुन पाहिले तर बाजुला क्लीनअर चा डुपट्टा पडलेला दिस ल्याने स्थानिय नागरिकांनी कन्हान पोलीसांना माहीती देताच कन्हान पोलीस स्टेशनचे पोउपनि सुनिल अंबार्ते स्टाप सह घटनास्थळी पोहचुन सागर चा नहरात शोध सुरू केला. काही वेळाने नहराचे पाणी बंद करण्यात आल्याने सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान क्लीनअर सागर यादव चा मुत्युदेह नहरातुन बाहेर काढुन  ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे श्वविच्छेदना करिता पाठविण्यात आला. ट्रक क्लीनअर सागर यादव चा पाय घसरून नहरातील पाण्यात पडल्याने डुबुन मुत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असल्याने कन्हान पोलीस घटनेचा पुढील तपास करित आहे.  


मृतक सागर उर्फ सोनु यादव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला :तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

Sat Jul 31 , 2021
कन्हान पोलीसांनी अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला #) तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पांधन रोड हनुमान नगर कन्हान येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत अस तांना एक ट्रैक्टर अवैध रेती वाहतुक करित असतांना मिळुन आल्याने त्याचा जवळुन रेती, ट्रॅक्टर व ट्राली असा एकुण तीन […]

You May Like

Archives

Categories

Meta