कन्हान शहरात १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा

कन्हान शहरात १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा

कन्हान,ता.१६ ऑगस्ट

     भारत देश १९४७ ला स्वातंत्र होऊन ७६ वर्ष पुर्ण होऊन या वर्षी ७७ वा स्वातंत्र दिन कन्हान परिसरातील शासकिय, सामाजिक, शैक्षणिक संस्था व्दारे विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.

स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान

   स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत ग्रामोन्नती प्रतिष्ठान कन्हान व्दारे या वर्षी मंगळवार (दि.१५) ऑगस्ट २०२३ ला भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा स्वातंत्र दिन सोहळा सकाळी ९.३० वाजता स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे आयोजित करण्यात आले.

मा.दिवाळु देशमुख सर, मा.एकनाथ खर्चे सर, माजी सैनिक यांच्या हस्ते भारत माता, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून मा.डॉ.श्रीकृष्ण जामोदकर यांच्या हस्ते ध्वजाचे पुजन व पुष्पहार अर्पण करून नगरसेविका रेखा टोहणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. मान्यवरांनी स्वातंत्र दिनाच्या उपस्थिताना शुभेच्छा दिल्या. देशाला स्वातंत्र प्राप्त करून देण्यासाठी वीर महात्म्यानी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन स्वातंत्र मिळवुन दिले आहे. हे स्वातंत्र अबाधित टिकविण्याकरिता आपल्या सर्व नागरिकांना सुध्दा महत्वाची भुमिका पार पाडावी लागणार आहे. यास्तव आपण सर्वानी सुध्दा देशाकरिता कर्तव्य निष्ठा बाळगली पाहीजे. अशे स्वामी विवेकानंद चॅरिटे बल ट्रस्ट आणि ग्रामोन्नती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश जाधव यांनी मार्गदर्शनात संबोधित केले.

उपस्थित सर्वाना अल्पोहार व चाय वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, नेवालाल पात्रे, डॉ काठोके, नथुजी चरडे, रतिराम सहारे, मधुकर नागपुरे, किशोर अरोरा, कोठीराम चकोले, ताराचंद निंबाळकर, चंद्रशेखर कळमदार, प्रविण गोडे, भगवान यादव, गणेशजी खांडेकर, रवि रंग, विजय डोणेकर, गोविंद जुनघरे, देवा चतुर, संजय हावरे, रविंद्र चकोले, जिवन ठवकर, बंटी हेटे, हबीब शेख, रूपेश सातपुते, राजु गणोरकर, धर्मराज चिखले, अजय ठाकरे, जितु तिवारी , संतोष गिरी, निशांत जाधव, गौरव भोयर, नगरसेविका गुंफा तिडके,कल्पना नितनवरे, वनिता कावळे सह मोठया संख्येने माजी सैनिक, प्रतिष्ठीत नागरिक सह नगरवासी उपस्थित होते.

नगरपरिषदेत “मेरी माटी मेरा देश” अंतर्गत विविध उपक्रम

      मंगळवार (दि.१५) ऑगस्ट २०२३ ला भारतीय स्वातंत्र्य दिन नगरपरिषद कन्हान-पिपरी क्षेत्रात “मेरी माटी मेरा देश” व “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.

स्वातंत्र्य दिन नगर परिषद कन्हान-पिपरी येथे सकाळी ८.०५ वाजता सर्वप्रथम नगरपरिषद अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, सर्व नगरसेवक, नगर सेविका यांच्या हस्ते कार्यालयातील स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून लगेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व पदाधिकारी यांचे नगरपरिषद कर्मचारी यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. यानंतर कन्हान शहरातील बलिराम दखने हायस्कुल च्या चमुनी पथनाट्य सादर करण्यात आले.

सर्व उपस्थित मान्यवरांनी सदर पथनाट्याचे कौतुक केले. नगरसेवक राजेश यादव, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. करुणाताई आष्टनकर यांनी उपस्थिता समोर मनोगत व्यक्त केले.

“मेरी माटी मेरा देश” तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रम अंतर्गत राष्ट्रध्वजाचे महत्व व सन्मान विषयी उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कन्हान शहरातील सर्व माजी सैनिक वृंद , नगरपरिषद उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगर सेवक राजेश यादव, राजेंद्र शेंदरे, डायनल शेंडे, नगर सेविका कल्पना नितनवरे, गुंफा तिडके, रेखा टोहणे, संगिता खोब्रागडे, अनिता पाटील तसेच पाणीपुरवठा अभियंता फिरोज बिसेन, स्थापत्य अभियंता नामदेव माने, अग्निशमन पर्यवेक्षक हर्षल जगताप , कनिष्ठ लिपिक रविंद्र धोटे, देवीलाल ठाकूर, निरंजन बढेल, प्रांजली सांभारे सह इतर कार्यालयीन कर्मचारी वृंद व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

 

श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान

 मंगळवार (दि.१५) ऑगस्ट २०२३ ला श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येते स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.

शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते ध्वारोहण करण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणुन माजी मुख्याध्यापिका वंदना रामपुरे उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा गायधने यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक हेमंत वंजारी, आयशा अंसारी, जयश्री पवार, कीर्ती वैरागडे, गीता वंजारी, मंदाकिनी रंगारी, नेहा गायधने, भास्कर सातपुते, अभिषेक मोहनकर आदी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन कीर्ती वैरागडे यांनी करून कार्यक्रमानंतर मुलांना अल्पोहर वितरण करण्यात आला.

कन्हान शहर विकास मंच द्वारे ७७ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात

    शहर विकास मंच द्वारे ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्य कार्यक्रम गांधी चौक कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रामुख्याने पोलीस निरीक्षक कन्हान सार्थक नेहेते यांच्या हस्ते राष्ट्र पिता महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभ भाई पटेल, शहिद भगतसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करूण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी तिरंगाध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले. तदंतर शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर, प्रदीप बावने यांनी स्वातंत्र्य दिवसा निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा हरिहर विद्यालय पारशिवनी येथे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा व लेक्षी परीक्षा चाचणीत बळीरामजी दखने हायस्कुल शाळेच्या विद्यार्थी सुप्रित बावने हा तालुक्यातुन प्रथम आल्याने शहर विकास मंच च्या पदाधिका-यानी सुप्रित बावने चा नोटबुक, पेन, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कन्हान पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मंच सदस्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन करुन स्वातंत्र्य दिवस उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन हरीओम प्रकाश नारायण यांनी व आभार भुषण खंते यांनी मानले. याप्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन पोलीस हवालदार मुदस्सर जमाल, विठ्ठल मानकर, प्रकाश कुर्वे, सुरज वरखडे, संजय तिवसकर, सतिश ऊके, सचिन यादव, दिनेश भालेकर, विक्की कुमार सह आदि मंच पदाधिकारी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जिल्हा स्पर्धेत गुरुकृपा आखाड्यातील विद्यार्थीनी २३ पदके पटकावले 

Mon Aug 21 , 2023
जिल्हा स्पर्धेत गुरुकृपा आखाड्यातील विद्यार्थीनी २३ पदके पटकावले कन्हान,ता.२१ ऑगस्ट     १८ वी आष्टे डु मर्दानी आखाडा जिल्हा स्तरीय स्पर्धा रामटेक येथे घेण्यात आले. यात गुरुकृपा आखाडा राम सरोवर, टेकाडी च्या विद्यार्थ्यानी शिवकलेत सुर्वण पदक १३, रजत पदक ६ व कास्य पदक ४ असे एकुण २३ पदक प्राप्त करून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta