पाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

*पाराशिवनी तालुक्यातिल निवडणुक प्रक्रिया आज पासुनप्रारंभ१०ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर*

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

जाहिरातीसाठी 7020602961

*पाराशिवनी* (ता प्र):-: तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असल्याने ग्रामीण भागातील राजकारण हळुहळु तापू लागले आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत सदस्य निवडीनंतर होणार असल्याने सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर डोळा ठेवून असणारांची गोची झाली आहे. मात्र आता ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व रहावे यासाठी व्युहरचना केली जात आहे.
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ काही महिन्यांपुर्वीच संपुष्टात आला होता. मात्र राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थगीत करून ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकावर सोपविण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू लागला असल्याने
स्थगीत करण्यात आलेल्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाराशिवनी तालुक्यातील १० ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे.
पाराशिवनी तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या गावातील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. काही गावातील ग्रामस्थ सामज्यसपणे ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याच्या मानसिकतेत आहेत. परंतू ज्या गावांमध्ये जोरदार पक्षीय राजकारण आहे त्या गावांमध्ये मात्र जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
पुर्वी बहुतांशी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होत असत. एकच व्यक्ती अनेक वर्षे गावचे सरपंच पद सांभाळत असे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका कथी येत आणि कधी जात हे
सर्वसामान्यांना माहितही पडत नसत. मात्र आता काळ बदलला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आले आहे. राजकिय पक्ष देखील ग्रामपंचायत निवडणुक प्रतिष्ठेची करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका विधान सभा किंवा लोकसभेच्या निवडणुकांपेक्षाही महत्वाच्या मानल्या जात आहेत.
पारशिवनी तहासिल चे तहसिलदार व निवडणुक आधिकारी वरूण कुमार सहारे यांनी माहीती दिली की तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रमानुसार २३ ते ३० डिसेंबर दरम्यान नामनिर्देश पत्र स्विकारले जाणार आहेत. ३१डिसेंबर ला दाखल अर्जाची छाननी होणार आहे.१ ते ४ जानेवारी २०२१ ता या मुदतीत अर्ज मागे घेण्याची मुद्दत दुपारी ३वाले पर्यतघेता येईल ,याच दिवसी उमेदवाराना निवण्डणुक चिन्ह देण्यात येणार आहे, तर १५ जानेवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. असुन १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर २३ जानेवारी २०२१ रोजी दहा ही ग्राम पंचायत चे सरपंच पदाच्या आरक्षणाची लॉटरी फुटणार आहे. तालुक्यातिल् (१)बोरी(सिगोंरी),(२)सुवरधरा,(३)ईटगाव,(४)माहुली, (५)खेडी,(६)खंडाळा(घ),(७)नवेगाव खैरी,(८)आमगाव ,(९)पिपळा,(१० निमखेडा या ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्यामुळे आता ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन

Wed Dec 23 , 2020
*भिलगाव येथे विजबिल स्वीकृति केंद्राचे उद्घाटन* कामठी : भिलगाव येथील विज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन भिलगाव येथे विद्युत मंडळाचे विज बिल स्विकृती केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपुर जिल्हा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते व नागपुर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष […]

You May Like

Archives

Categories

Meta