गुंडाची गळा कापून हत्या ; पैशाच्या मागणीतून वाद : चनकापूर शिवारातील घटना , चौघांना केली अटक

गुंडाची गळा कापून हत्या
पैशाच्या मागणीतून वाद : चनकापूर शिवारातील घटना , चौघांना केली अटक

खापरखेडा : पैशाच्या वाटाघाटीतून झालेल्या वादात खापरखेडा परिसरात राहणाऱ्या एका सराईत गुंडाची गळा चिरून हत्या करण्यात आली .अश्विन ढोणे ( २४ , रा . वॉर्ड क्रमांक ४ , खापरखेडा ) असे मृताचे नाव आहे . ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शिवराम नगर , चनकापूर येथे घडली . हत्येप्रकरणी रात्री ११ वाजताच्या सुमारास कोलारनदी पात्रात चौघांना अटक केली . शुभम राजेंद्र पाटील ( २२ ) , तुषार नारनवरे ( १८ ) , शानु केशव थापा ( २२ ) आणि एका विधीसंघर्ष बालकाचा यात समावेश आहे .


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , मृत अश्विन ढोणे आणि शुभम पाटील हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत . अश्विनवर खून , खुनाचा प्रयत्न , मारहाण , अवैध कट्टा बाळगणे व वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर शुभम पाटीलवरही चोरीचे गुन्हे दाखलआहेत . शुभम याने काहीतरी प्रकरण करून ४ ते ५ लाख रुपये आणले असल्याची माहिती अश्विनला मिळाली होती . तेव्हापासून अश्विन हा शुभम आणि त्याच्या साथीदारांना त्यात वाटा मागत ब्लॅकमेल करीत होता . तीन दिवसापूर्वी अश्विनने शुभमच्या साथीदारास पैशाची मागणी करून चाकू दाखवीत शुभम व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती . अश्विन आपला गेम करेल , अशी भीती दोघांना होती . त्यामुळे त्यांनी अश्विनचा काटा काढण्याचे ठरविले . त्यांनी अश्विनला वाटाघाटी करण्यासाठी शिवराम नगर येथील पडित शेतात बोलावले . त्यानंतर नियोजितरीत्या अश्विनला पकडून त्याचा गळा चिरला व शरीरावरही चाकूने धाव मारण्यात आले . अश्विन मृत झाल्याची खात्री पटल्यावर आरोपी तेथून पसार झाले . पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू , एक दुचाकी वाहन व दारूच्या बाटल्या जप्त केल्या . आरोपीच्या शोधासाठी खापरखेडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक तैनात होते . पथकाने रात्री या चौघांना कोलारनदी पात्रात अटक करून खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

नागपुर ब्रेकिंग : ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Thu Oct 15 , 2020
Nagpur breaking नागपूर जिल्ह्यातील कोंढाली येथील रिगल इन रिसॉर्ट मध्ये ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई 80 लाख रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त 50 च्या वर लोकांना ताब्यात घेण्यात आला असून काही मुलीनांही ताब्यात घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती Post Views: 232

You May Like

Archives

Categories

Meta