कन्हान येथे कायदा सुव्यवस्था कडक करण्याची मागणी

*कन्हान येथे कायदा सुव्यवस्था कडक करण्याची मागणी*

#) भाजपा पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन


कन्हान – कन्हान शहरात व परिसरात गेल्या काही दिवसान पासुन चोरींच्या गुन्ह्यात वाढ होत असुन अवैद्य धंधे व असामाजिक तत्व मोठ्या प्रमाण वाढले असुन शहरात शांती सुव्यवस्था मध्ये बिघाड झाल्याने व धोक्यात येत असल्याने यावर अंकुश लावण्याकरिता भाजपा पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन व या गंभीर विषया वर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ योग्य चौकशी करुन शहरात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची मागणी करण्यात आली असुन अवैध धंधे व कन्हान नदी पुलिया वरुन जात असलेले जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली आहे .

कन्हान शहरात व परिसरात किती तरी वर्षापासुन हत्या , डकैती , चोरी , घरफोडी , लुटमार , अवैध दारु , नशीले पदार्थ विक्की , रेती , कोळसा , जुआ , सट्टा , कबाडी , लाॅज , चाकु मारणे , बाल गुन्हेगारी , विनयभंग आदि विविध गुन्हेगारींचे प्रमाण वाढले असतांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारी वर आढा घालण्याकरिता तारसा रोड कन्हान येथे कामठी उपविभागीय पोलीस यांचे कार्यालय उघडले असतांना कन्हान शहरात व परिसरात गेल्या दीड ते दोन वर्षापासुन मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थे मध्ये बिघाड झाल्याने नागरिकांच्या घरा समोरुन भरदिवसा व रात्री  दुचाकी , स्कुटी वाहन चोरीचे व घरफोडी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन  शहरात जुआ सट्टा , रेती चोरी , कोळसा चोरी , नशीले पदार्थ विक्री , असामाजिक तत्व , अवैध दारु अश्या अवैध धंधे मध्ये वाढ झाल्याने लहान मुलांना पासुन तर युवा पीढ़ी नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी कडे वळत आहे . मागील काही वर्षा पुर्वी माजी पालकमंत्री श्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाअधिकारी यांनी कन्हान शहरातुन जड वाहतूकीला बंदी घातलेली असुन सुद्धा मोठ्या प्रमाणात कन्हान – कामठी नदी आडा पुलिया वरुन अवैध वाहतुक व जड वाहतुक बिनधास्त पणे सुरु असल्याने भाजपा पदाधिकार्यांनी तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजय काळे यांची भेट घेऊन स्वागत करुन गंभीर विषया वर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ योग्य चौकशी करुन शहरात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची मागणी करण्यात आली असुन अवैध धंधे व कन्हान नदी पुलिया वरुन जात असलेले जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ग्रामीण नागपुर जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे , मयुर माटे , सचिन वासनिक , रुषभ बावनकर , संजय रंगारी , अमन घोडेस्वार सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन स्वागत

Sun Aug 29 , 2021
*कन्हान नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन स्वागत* #) शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री विलास काळे यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta