गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारे हुतात्मा दिवस व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांची जयंती कार्यक्रम

गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारे हुतात्मा दिवस व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांची जयंती कार्यक्रम

कन्हान ता.08 ऑक्टोबर

   यादव नगर येथील रहिवासी बंडु ईडपाते यांच्या निवास स्थानी गोंड सम्राट महात्मा राजा रावण मडावी यांचा हुतात्मा दिवस रावण गोंगो व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.

    कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष व नागपुर जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांच्या हस्ते व गोंडवाना गण तंत्र पार्टी उपाध्यक्ष सुखलाल मडावी, जिल्हाध्यक्ष धनराज मंडावी, कन्हान शहर अध्यक्ष सोनु मसराम, नागपुर जिल्हा महिला प्रकोष्ठ संघटक सुनिता उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत राजा रावण मडावी व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी राजा रावण मडावी व विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करित कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेश यादव, कांद्री ग्राम पंचायत सदस्य राहुल टेकाम, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रामलाल पट्टा, बहुजन समाज पार्टी पारशिवनी तालुका अध्यक्ष राजेंद्र फुलझले, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष व ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य ऋृषभ बावनकर, शहर विकास मंच सचिव सूरज वरखडे, राजेश सयाम, निराश कोड वते, बंडु इरपाते, नामदेव कोडापे, बालचंद भलावी, शंकर इनवते, संदीप परते, राजेश फुलझाले, अभिजित चांदुरकर, राजकुमार मेश्राम, पप्पु धरणे, अनिलभाऊ पंधराम, राजेश टेकाम, नितीन इरपाते, राजवीर मडावी सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज व्दारे धम्म प्रेमीना भोजन वितरण

Sun Oct 9 , 2022
पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज व्दारे धम्म प्रेमीना भोजन वितरण कन्हान,ता.08 ऑक्टोबर    सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्य नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर व्दारे धम्म प्रेमींचे स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले. […]

You May Like

Archives

Categories

Meta