यशवंत विद्यालय वराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा  

यशवंत विद्यालय वराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा

कन्हान,ता.०४ जानेवारी

   वराडा केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जि.प.प्राथमिक नऊ शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा यशवंत विद्यालय वराडा शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला.

         बुधवार (दि.४) जानेवारी रोजी आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन यशवंत विद्यालय वराडा चे संचालक भुषण निंबाळकर तर प्रमुख अतिथी म्हणुन श्रीमती किर्ती निंबाळकर मुख्याध्यापिका यशवंत विद्यालय वराडा, श्रीमती चिखले मँडम सरपंच वराडा, श्रीमती नाकतोडे मँडम सदस्य ग्रा.प.वराडा, नेताजी घोडमारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वराडा प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्याना शिक्षणा सोबतच शारिरीक विकास साधण्या करिता विद्यार्थ्यां मध्ये क्रीडा स्पर्धेचे सुध्दा अत्यंत महत्व आहे. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील यशस्वि वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.  क्रीडा स्पर्धेत वराडा केंद्रातील वराडा, कांद्री , टेकाडी, वाघोली, नांदगाव, एसंबा, बखारी, गोंडेगाव, कोयला खदान आदी ९ शाळेचे जवळपास १५० विद्या शर्थ्यांनी सहभाग घेतला होता. क्रीडा स्पर्धेत गोंडेगाव, कोयला खदान, बखारी, वराडा या शाळेच्या चमुनी विजयश्री प्राप्त केला. सदर क्रीडा स्पर्धेचे आयोजन केंद्रप्रमुख प्रविण बेंदले यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक वामन पाहुणे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रमोद चांदेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  कांडलकर, प्रेमचंद राठोड, राजेंद्र गभणे, राकेश गणवीर, सतिश कुथे, मोतीराम रहाटे, रोशन राऊत, दिपक पांडे, अर्चना शिंगणे, निनावे मँडम, लांजेवार मँडम यांनी विशेष सहकार्य केले. तसेच वराडा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक तथा सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षिका यांचे मौलाचे सहकार्य लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे द्या- मिलिंद वानखेडे  धर्मराज प्राथमिक शाळेत स्वयंरोजगाराचा बालआनंद मेळावा

Thu Jan 5 , 2023
  लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे द्या- मिलिंद वानखेडे धर्मराज प्राथमिक शाळेत स्वयंरोजगाराचा बालआनंद मेळावा कन्हान,ता.०४ जानेवारी     शालेय जिवनात शिक्षणासोबत स्वयंरोजगाराचे धडे गिरवले तर येणारी पिढी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी होईल. त्यामुळे बालवयातच स्वयंरोजगाराचे धडे दिले पाहिजे, असे आवाहन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी बाल आनंद मेळाव्याच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta