नवरात्रीचा उत्साह शिगेला: कार्यक्रमांची रेलचेल कन्हान गरबा महोत्सवात आनंदाला उधाण

नवरात्रीचा उत्साह शिगेला: कार्यक्रमांची रेलचेल

कन्हान गरबा महोत्सवात आनंदाला उधाण

कन्हान,ता.२१

   कन्हान येथील गरबा महोत्सवात शेकडो प्रेक्षक स्पर्धकांच्या नृत्याचा आनंद घेत आहेत. कानपूर केमिकलच्या विशाल मैदानावर सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी माता राणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गरब्याला सुरुवात झाली.

  यावर्षी १५५ प्रशिक्षित स्पर्धक गरब्यात सहभागी झाले. विविध वेशभूषा परिधान केलेले गरबा नृत्य स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. २३ रोजी मेगा फायनलचे आयोजन करण्यात आले.असून बक्षीसांची लयलूट होणार आहे.

   जय मानवता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले, कार्याध्यक्ष कृष्णकुमार अग्रवाल, सचिव प्रदीप जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेश राऊत, सूरज वर्मा अमित घंटेरे, प्रकाश तिवारी, स्वाती मेश्राम, निक्कू पिल्ले, दीपचंद शेंडे, विजय खडसे, शुभांगी घोगले, मनीषा चिखले, लता लुंदरे, सुनीता वैद्य, कुंदा मोटघरे, वैशाली वैशाली, सुनिता शेंडे आदी परिश्रम घेत आहेत. २४ रोजी रावण दहन आणि २५ रोजी घट विसर्जन याच मैदानात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सार्वजनिक वाचन कक्षात वाचक प्रेरणा दिन

Sun Oct 22 , 2023
सार्वजनिक वाचन कक्षात वाचक प्रेरणा दिन कन्हान,ता.२१   माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती हनुमान नगर कन्हान येथील सार्वजनिक वाचन कक्षात वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.    विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, वाचन कक्षाचे संचालक प्रकाश नाईक, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर अवचट यांची प्रमुख […]

You May Like

Archives

Categories

Meta