कन्हान शहराला 30 खाटांचे ग्रामिण रुग्णालय बनविण्यास हालचाली तेज – गज्जु यादव

कन्हान शहराला तीस खाटांचे ग्रामिण रुग्णालय बनविण्यास हालचाली तेज – गज्जु यादव

#) आरोग्यमंत्र्यां कडुन आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्य प्रशासनाला सुचना.

कन्हान : – येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती सुदृढ होऊ शकते. सर्व काही सुरळीत राहिल्यास लव करच हे प्राथमिक आरोग्य केंद्र ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय होण्याच्या हालचाली ला वेग येत आहे. याबाबत रामटेक पं स चे माजी उपसभापती उदयसिंग उर्फ ​​गज्जु यादव यांनी २०१९ पासुन प्रयत्न सुरू केले असुन त्याचे सकारात्मक परिणाम दिसु लागले आहे. उपसंचालक आरोग्य सेवा, नागपुर विभाग यांनी या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोपचार रुग्णालय, नागपुर यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे ३० खाटांच्या ग्रामिण रुग्णाल यात रूपातर करण्यासाठी लवकरच सर्व आवश्यक माहिती सह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशात म्हटले आहे.
रामटेक पं स चे माजी उपसभापती गज्जु यादव यांनी नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यां च्या मार्फत २४ सप्टेंबर २०२१ ला महाराष्ट्र सार्वजनि क आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. राजेश टोपे यांना या संदर्भात एक विनंती केली होती. रामटेक विधानसभा मतदार संघात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चा दर्जा वाढवुन येथे आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. जिल्हा परिषदे चे प्राथमिक आरोग्य केंद्र पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगरपरिषद हद्दीत असल्याचे पत्रात म्हटले आहे. ग्राम पंचायत कन्हान चे २०१३-१४ मध्ये नगरपरिषदेत रूपांतर होऊनही आजही येथे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत सुरू आहे. त्यामुळे कन्हान परिसरातील रुग्णांना आव श्यक सेवा सुविधा मिळु शकत नाहीत. कन्हान नगर परिषद क्षेत्राची लोकसंख्या आणि परिसरात औद्योगि क क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत अस ल्याची बाब लक्षात घेऊन कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवुन ग्रामिण रुग्णालय बनविण्यास मान्यता देण्यात यावी, जेणे करून येथील नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळु शकेल. मागणीचे पत्र राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री मा. जयंत पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनाही देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. राजेश टोपे यांनी गज्जु यादव यांच्या विनंतीची दखल घेऊन उपसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय (राज्यस्तर), मुंबई यांनी दि.७ एप्रिल २०२२ रोजी उप संचालक आरोग्य सेवा नागपुर विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नागपुर यांना लेखी सुचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चा दर्जा उंचावुन ते ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय करण्या संद र्भात आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशात म्हटले आहे. त्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा नाग पुर विभाग यांनीही याच मागणी बाबत जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय नागपुर यांना लेखी सुचना दिल्या. त्यामध्ये सदर मागणी बाबत संपुर्ण माहिती सह आवश्यक प्रस्ताव लवकरच सादर करण्या स सांगितले आहे.
मंत्रालयाने मुंबईत पुर्ण झालेल्या प्रस्तावाचा आदर केल्याने कन्हान येथील ग्रामिण रुग्णालयाला लवकरच मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची आशा उदयसिंग उर्फ ​​गज्जु यादव यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० % निकाल ; कन्हान शहरातुन बारावी परिक्षेत मुलीने बाजी मारली

Wed Jun 8 , 2022
धर्मराज कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० % निकाल #) कन्हान शहरातुन बारावी परिक्षेत मुलीने बाजी मारली. कन्हान : – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाद्वारे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या १२ वी च्या मार्च २०२२ च्या निकालात धर्मराज कनिष्ठ महा विद्यालयाचा १०० %, नारायण विद्यालय १०० %, निकाल लागला असुन याहीवर्षी कन्हान शहरातुन […]

You May Like

Archives

Categories

Meta