डाॅ हरिभाऊ आदमने विद्यालयातील प्राध्यापकाने केले १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण

डाॅ हरिभाऊ आदमने विद्यालयातील प्राध्यापकाने केले १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण

कुलगुरूंना निवेदन : द्वेषभावनेतून अंतर्गत गुण कमी दिल्याचा आरोप

विद्यार्थ्यांकडून पैसे मागण्याचा आरोप


सावनेर, ता . २३ : कोरोनामुळे परीक्षा घेणे अशक्य झाल्याने अंतिम वर्ष वगळता इतर सत्रातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला होता . असे असतानाही डॉ . हरिभाऊ आदमने कला , वाणिज्य महाविद्यालयातील बीए प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात प्राध्यापक डॉ . मिलिंद साठे यांनी अंतर्गत गुण कमी दिले . तब्बल १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याची माहिती समोर आली आहे . या विद्यार्थ्यांनी विद्यापीठासमोर आंदोलन करीत कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले आहे .

विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार , त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक कार्य पूर्ण केले आहे . शिवाय कोरोनामुळे मार्चपासून महाविद्यालय बंद असल्याने तासिका बंद होत्या . शासनाच्या निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार होता . हे करताना त्यांचा मागील वर्षाचा निकाल व वार्षिक कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करावे , अशा सूचनाही दिल्या होत्या . त्यामुळे प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळेल , असे अपेक्षित होते . मात्र , महाविद्यालयात निकालासाठी गेले असता त्यांना मराठी विषयामध्ये अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे दिसून आले . यावर विद्यार्थ्यांनी विषयाचे प्राध्यापक डॉ . साठे यांची भेट घेतली असता त्यांनी तुमची एवढेच गुण घेण्याची पात्रता असल्याचे उत्तर दिले . त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली आहे . अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्रथम सत्राचे ८० तर द्वितीय सत्राचे २५ विद्यार्थी आहेत . शासनाने पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला असतानाही केवळ सूडभावनेतून डॉ . साठे यांनी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले . त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे . विद्यापीठाने डॉ . साठे यांच्यावर कारवाई करून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देत उत्तीर्ण करावे , अशी मागणी करण्यात आली आहे .

डॉ . साठेंना याआधीही ठरवले होते दोषी
डॉ . मिलिंद साठे यांनी मागील वर्षीही १२५ विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देता अनुत्तीर्ण केल्याची तक्रार होती . त्यानंतर हे प्रकरण विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीपुढे पाठवण्यात आले होते . यावर डॉ . साठे यांना समितीने दोषी ठरवत विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर अंतर्गत परीक्षेचे गुण देण्यात यावे , अशी शिफारस समितीने केली होती .

प्रतिक्रिया:-
विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती . वारंवार अहवाल मागितला , मात्र प्रा.मिलिंद साठे यांनी आजवर कुठलेही अहवाल जमा केलेला नाही. विद्यापीठाने कार्यवाही करण्याचा लेखी आदेश द्यावा नतंर काय कराचे पाहू विद्यापीठाच्या पत्रानुसार समिती तयार करून प्रकरणाची तपासणी करित आम्ही अहवाल पाठविलेला आहे. विद्यापीठाने दिलेल्या आदेशाला प्राध्यापक साठे हे नेहमी केराची टोपली दाखवित विद्यापीठाची अवहेलना करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत.
*डॉ.वीरेंद्र जुमडे प्राचार्य..*

सूडाच्या भावनेतून फसविण्याचा प्रयत्न प्राचार्यांकडून करण्यात येत आहे. मला नाहक त्रास देऊन अशा चुकीचा तक्रारी करून फसविण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी असाइमेन्ट तयार केले नसताना त्यांना कुठल्या आधारावर गुण द्यायचे..? केवळ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे आमिष देत माझ्या विरोधात तक्रारी करण्यात येत आहे…
*प्रा.मिलिंद साठे..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर

Thu Dec 24 , 2020
वीज कंपन्यांतील रिक्त पदे भरण्यासाठी वेगाने प्रक्रिया राबवा–उर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले निर्देश *ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर* *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार उद्या बैठक* मुंबई : राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमध्ये नियुक्ती प्रक्रिया अद्याप पूर्ण का करण्यात आली नाही, यासाठी येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी वीज कंपन्यांकडून […]

You May Like

Archives

Categories

Meta