कन्हान ला सक्षम, कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-यांची नियुक्ती करा

  • कन्हान ला सक्षम, कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-यांची नियुक्ती करा

#) सर्व पक्ष, विविध संघटना, सामाजिक कार्य कर्त्यांच्या बैठकीत एकमत

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान शहरात व परिसरात चोरी, घरफोडी, अवैद्य दारू, नसीले पदार्थ विक्री, जुआ, सट्टा, रेती, कोळसा, लोंखड, डिझेल, वाहन चोरीचे प्रमाण वाढुन असामाजिक तत्व वाढुन बाल गुन्हेगारी, विनयभंग आदी विविध गुन्हेगारींचे प्रमाण वाढत असुन शहरात शांती सुव्यवस्था धोक्यात येत असल्याने यावर अंकुश लावण्याकरिता शहरातील सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना, सामाजिक कार्यक र्ते, युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकात कन्हान ला सक्षम, कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी व कन्हान थानेदार यांची नियुक्ती होण्या संदर्भात चर्चा करून पुढील कार्यवाही करण्या विषयी सर्वानुमते ठरविण्यात आले.

बुधवार (दि.२६) ऑगस्ट २०२१ ला सायंकाळी ७ वाजता डोणेकर सभागृह कन्हान येथे सर्व पक्षाचे दुस ऱ्या व तिसऱ्या फळीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची पहि ल्यांदा बैठक संपन्न होऊन यात कन्हान शहरात काम ठी उपविभागीय पोलीस अधिकारीयांचे कार्यालय तार सा रोड कन्हान येथे झाल्यापासुन कन्हान पोलीस स्टे शन अंतर्गत शहर व परिसरात चो-या, घरफोडी, अवैद्य दारू, नसीले पदार्थ विक्री, रेती, कोळसा, लोंखड, डिझे ल, वाहन चोरीचे प्रमाण वाढले असुन जुआ, सट्टा, कबाडी, लॉज चे ही प्रमाण दिवसे दिवस वाढु लागले आहे. लहान मुलापासुन तर युवा पिढी नसेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी कडे वळत आहे. अवैध वाहतुक,टोल वाचविण्याकरिता शहरातुन जड वाहतुक बिनधास्त सुरू असल्याने नागरिकांना, शालेय विद्यार्थी व जेष्ट नागरिकांना रस्त्याने येणे-जाणे कठीण होत आहे.पोली स अधिका-यांच्या दुर्लक्षतेने असामाजिक तत्व डोके वर काढु लागल्याने मारपीट, चाकु मारणे, लुटमारी च्या घटना सामान्य होत, बाल गुन्हेगारी, विनयभंग आदी विविध गुन्हेगारींचे प्रमाण वाढुन सुध्दा पोलीस प्रशास नाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंग गिळुन गप्प आहे का ? हा नागरिकांचा चर्चेचा विषय बनला आहे.विशेष म्हणजे थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या १ वर्ष ५ महि न्याच्या कार्यकाळात शहरातील शांती सुव्यवस्था चांग लीच धोक्यात आल्याने यावर अंकुश लावण्याकरिता पहिल्यांदा शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संप न्न होऊन शहराच्या उज्वल भविष्याच्या दुष्टीने कन्हान ला सक्षम, कर्तव्यदक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी व कन्हान थानेदार यांची नियुक्ती करण्यात आली नाही तर कन्हान शहराच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितार्थ शांती सुव्यवस्था प्रस्थापित करण्या संदर्भात पुढील कार्यवाही करण्या विषयी चर्चा करून सर्वानुमते ठरवि ण्यात आले. बैठकीस कन्हान-पिपरी युवा सामाजिक नेते सतीश भसारकर, लोकेश बावनकर, सुत्तम मस्के, प्रविण गोडे, ज्ञानेश्वर दारोडे, शैलेश दिवे, नरेश सोनेकर ,, भारत पगारे, राजेंन्द्र फुलझले, शरद वाटकर, रिंकेश चवरे, शैलेश शेळकी, मयुर माटे, अजय लोंढे, ऋृषभ बावनकर, अमन घोडेस्वार, शाहरुख खान, रजनिश मेश्राम, अखिलेश मेश्राम, गौतम नितनवरे, रोहित मान वटकर, नितिन मेश्राम, चिंटु वाकुडकर, दिनेश नारनवरे ,पवन नांदुरकर, रोशन फुलझले, उमेश पौनिकर,समीर मेश्राम, समशेर पुरवले, निखिल लोणारे, अशोक नारन  वरे, अजय चव्हान, सौरभ यादव आदी युवा आणि या विषयावरील गंभीरपणे दखल घेत कन्हान-पिपरी चे सुज़ान नगरपरिषद नगरसेविका, रेखाताई टोहणे, गुंफा ताई तिडके, मोनिका पौनिकर, सुषमा चोपकर, पुष्पा ताई कावळकर, संगीता खोब्रागडे, राजेंद्र शेंदरे, योगेंन्द्र रंगारी, मनिष भिवगडे, विनय यादव सह अनेक नागरि क प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गोवा विधानसभा निवडणुक 2022 साठी नागपुर चे विश्वजीत शिवबहादुर सिंह यांची समन्वयक पदी नियुक्ति

Fri Aug 27 , 2021
गोवा विधानसभा निवडणुक 2022 साठी नागपुर चे विश्वजीत शिवबहादुर सिंह यांची समन्वयक पदी नियुक्ति नागपूर: नागपूर चे कांग्रेस पक्षाचे विश्वजीत शिवबहादुर सिंह यांची अखिल भारतीय कांग्रेस कमेटी कडून गोवा विधानसभा निवडणुक 2022 साठी समन्वयक पदी नियुक्ति करण्यात आली आहे, गोवा राज्याचे कांग्रेस चे प्रभारी व कर्नाटक चे आमदार दिनेश गुंडू […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta