कन्हान ला संविधान दिवस थटात साजरा  

कन्हान ला संविधान दिवस थटात साजरा

            कन्हान शहर विकास मंच

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : –  येथील आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माल्यार्पण, अभिवादन व संविधान प्रास्तविकाचे वाचन करून विविध सामाजि क, राजकिय संघटना व्दारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला. 

               कन्हान शहर विकास मंच


       डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कन्हान शहर विकास मंच च्या वतीने मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्या  र्पण व मेणबत्ती प्रज्वलित व अभिवादन करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मंच अध्यक्ष प्रविण गोडे, सचिव प्रदीप बावने, मंच महिला आघाडी सदस्या सुषमा मस्के यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. सर्व मंच पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करून संविधान प्रास्ता विकाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांनी तर आभार मंचसदस्य सोनु खोब्रागडे यांनी व्यकत करून  संविधान दिवस थटात साजरा करण्यात आला. कार्य  क्रमास कन्हान-पिपरी न प नगरसेविका रेखा टोहणे, मंच कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, सदस्य संज य रंगारी, शाहरुख खान, सतिश ऊके, वैशाली खंडार, पौर्णिमा दुबे, प्रकाश कुर्वे, अश्विन भिवगडे, जाॅकी मानकर आदी मंच पदाधिकारी उपस्थित होते.

       भारतीय जनता पार्टी कन्हान शहर 

           डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भारतीय जनता पार्टी व्दारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भाजपा कन्हान शहर अध्य क्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते माल्यार्पण, अभिवा दन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिका-यानी डॉ बाबासाहेबाच्या पुतळयास पुष्प अर्पण करून संविधान प्रास्ताविकांचे वाचन केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे,  भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे यानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री सुनिल लाडेकर यांनी तर आभार रिंकेश चवरे यांनी व्यकत करून संविधान दिन थाटात साजरा केला. कार्यक्रमा स कन्हान न प विरोधी पक्ष गट नेता राजेन्द्र शेंदरे,  मयुर माटे, संजय रंगारी, दीपंकर गनवीर, ऋृषभ बाव नकर, अजय लोढ़े, माधव वैद्य, सुरेश कळम्बे, अमन घोडेस्वार, अंकित दिवे, शालिनी बर्वे, स्वाती पाठक, अनिता पाटिल, सुषमा मस्के, तनुश्री आकरे, मिना कळंम्बे आदी सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संविधान दिना निमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

Fri Nov 27 , 2020
  कामठी : संविधान दिना निमित्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना माजी राज्यमंत्री व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख अॅड . सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे भारतीय प्रास्ताविकचे वाचन ड्रॅगन पॅलेस टेम्पल कॅम्पस , दादासाहेब कुंभारे परिसरात असलेले डॉ . […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta