तीन दुकानातुन ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास

कांद्री येथील तीन दुकानातुन अज्ञात चोरट्यांनी केला ३१,००० रुपयाचा मुद्देमाल लंपास

फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या धन्यवाद गेट समोर कांद्री येथे असलेल्या फिर्यादी हसन मंजर खाजेमन्सुर
यांच्या दुकानातुन जुने वापरते लोखंडी डिस्क २ नग ,
फिर्यादी यांच्या दुकाना चे शेजारी दुकानदार मोहम्मद ताहीर अन्सारी 8 नग टैक्स कि व बाबु अन्सारी यांचे दुकानासमोर ३ डिक्स व टक हाउजिंग विगत सह एकूण ३१,००० रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला असुन आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक ०१ फ्रेब्रुवारी २०२२ ला सायंकाळी ७:०० वाजता ते बुधवार चे २ फेब्रुवारी २०२२ ला सायंकाळी ६:०० वाजता च्या दरम्यान धन्यवाद गेट समोर असलेल्या फिर्यादी
हसन मंजर खाजेमन्सुर वय २२ वर्ष राहणार हरीहर नगर वार्ड नंबर १ कांद्री यांचे पंचर चे दुकान असुन दुरुस्ती करीता आलले जुने वापरते लोखंडी डिक्स २ नग किंमत ४,००० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेला असुन फिर्यादी हसन मंजर खाजेमन्सुर यांचे दुकानाचे शेजारी दुकानदार मोहम्मद ताहीर अंन्सारी ८ नग टैक्स किमंत १६,००० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेला .व बाबु अन्सारी यांचे दुकाना समोरुन ३ डिक्स व टक हाउजिंग विगत ११,००० रुपए असा एकूण ३१,००० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी हसन मंजर खाजेमन्सुर यांचा तोंडी रिपोर्ट वरून व पोलीस निरीक्षक विलास काळे आदेशाने अज्ञात आरोपी विरुद्ध
अपराध क्रमांक ४४/२०२२ कलम ३७९ भांदवी अन्वये
गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक फौजदार गणेश पाल हे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

वराडा शेतशिवारात बिबटया च्या हल्ल्यात १ कारवड ठार

Sat Feb 5 , 2022
वराडा शेतशिवारात बिबटया च्या हल्ल्यात १ कारवड ठार. #) सहा गावच्या शेत शिवारात बिबटयाच्या १० वेळा हल्यात १२ प्राळीव प्राणी ठार तर ५ जख्मी. कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा वराडा गाव च्या शेत शिवारात बिबटयाने तिस-यादा हल्ला करून एक जर्शी कारवड ठार केली असुन आता पर्यंत ३ प्राळीव जनावरे […]

Archives

Categories

Meta