ग्रा.पं.येसंबा येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन 

ग्रा.पं.येसंबा येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन

कन्हान,ता.२० फेब्रुवारी

    ग्रामपंचायत येसंबा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

सरपंच कु.सोनुताई इरपाते यांनी अध्यक्ष स्थान भुषविले तर उपसरपंच धनराज हारोडे यांनी प्रमुख अतिथीचे स्थान भुषविले. सरपंच आणि उपसरपंच यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

(ता.१६) जानेवारी रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिर ग्रामपंचायत येसंबा येथे घेतले होते. यानिमित्ताने गरजु लोकांना शिवजयंतीला मोफत चष्मे वाटप करण्यात आले.‌

    प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुभाष चकोले, करिष्मा पानतावणे, रेवती डडुरे, ज्ञानेश्वरी घरजाळे, वर्षा महाल्ले, प्रेरिका हिरा चकोले, आशा वर्कर सुषमा गजभिये, श्रीराम चकोले, रामदास तांडेकर, फुलचंद इरपाते, अविराज मेश्राम,‌‌ पंकज चकोले, ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये व गावातील महिला आणि प्रतिष्ठीत नागरिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवरायांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे बाईक रॅली

Mon Feb 20 , 2023
शिवरायांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे बाईक रॅली कन्हान, ता.२० फेब्रुवारी     छत्रपती शिवरायांच्या ३९३ वी जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी शाखा कन्हान तर्फे बाईक रॅली काढून थाटात साजरी करण्यात आली.     वंचित बहुजन आघाडीचा सदस्यांनी तालुका वरिष्ठ पदधिकारी चंद्रमणी पाटील यांचा नेतृत्वात बाईक रॅली तुकाराम महाराज मंदिर, तुकाराम […]

You May Like

Archives

Categories

Meta