आंघोळीला गेले,जिव गमावुन बसले  : दोन सख्खा भावांचा तलावात बुडून मृत्यू 

आंघोळीला गेले,जिव गमावुन बसले 

फुटक्या तलावाने घेतला दोघांचा जीव 

दोन सख्खा भावांचा तलावात बुडून मृत्यू 

कुही-3 :  येथील फुटका तलावात आंघोळीला गेलेल्या दोन सख्खा भावाचा बुडून मृत्यू झाला ही घटना दी.3/10/2020 ला.11.30 वाजता घडली 


सनी शिवशंकर साहु(19),विरेद्र शिवशंकर साहु(16) रा.काली माता मंदीर कळमना नागपुर अशी मृतकाची नावे आहे.
मृतक सनी व वीरेद्र यांचा कबाडी चा व्यवसाय होता ते व त्यांचा सहकारी रुपेश अजीयता हे तिघेही कबाडी साहीत्य विकत घेण्याकरीता नागपुर वरुन आपल्या माल वाहक गाडीने आले त्यांनी चापेगडी देवळीकला भीवकुडं या गावामधुन कबाडी साहीत्य घेतले, त्यानंतर मुतर्‍या मोह मार्ग साळव्या मार्गावर फुटका तलाव त्यांना पाण्याने भरलेला दिसला सध्या तापमान जास्त आहे त्यामुळे तलावात आंघोळ करण्याचा  निर्णय त्यांनी घेतला ते कपडे काडुन पाण्यात शिरले आधी लहान भाउ विरेंद्र पाण्यात उतरला मात्र पाण्याच्या पातळीचा अदांज माहीत नसल्याने तो खोलगट भागात गेला पोहायचा अनुभव नसल्याने तो गटाघळ्या खाऊ लागला व बचाव बचाव म्हनुण ओरडु लागला हे बघुन मोठा भाऊ धावला तोही खोल पाण्यात गेला व बुडाला हे सर्व बघुन गाडी जवळ उभा असलेला रुपेश जानार्‍या येनार्‍यानां बचाव बचाव करुन विनंती करु लागला त्या दरम्यान देवळीकला येथिल दोन नागरिकानी पोलीस पाटील ममता उल्हास मेश्राम याना माहीती दिली.घटनेची माहीती मिळताच कुहीचे नायब तहसीलदार उपेश अंबादे, साहय्यक पोलीस निरीक्षक कमलेश  सोनटक्के आपल्या ताफ्यासह हजर झाले त्यांनी बचाव पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काठले शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर चे नामांकित श्री.अतुल मदनराव पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

Sun Oct 4 , 2020
मा. अतुल पाटील यांना जन्म दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सावनेर : 4 ऑक्टोंबरला श्री अतुल पाटील यांच्या सावनेर येथे जन्म झाला. नर्सरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे त्यांनी सावनेर येथील सुप्रसिद्ध असलेले  मॉर्निंग स्टार कॉन्व्हेंट येथून घेतले. यानंतर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी भालेराव हायस्कूल व एमसीवीसी येथून घेतले. खेळात मोठ्याप्रमाणात […]

You May Like

Archives

Categories

Meta