पालकमंत्री नितीन राऊत ची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट.

पालकमंत्री नितीन राऊत ची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट.

कन्हान : –  पारशिवनी तालुक्यात कोव्हिड -१९ च्या महामारी प्रतिबंधात्मक उपाय योजना करिता जिल्हा प्रशासना कडुन व आरोग्य विभागाकडुन होत असलेल्या असहकार्य व दिरंगाईच्या विरोधात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काॅंग्रेस नेते उदयसिंह ऊर्फ गज्जु यादव यांनी गांधी पुतळा व्हेरायटी चौक, सिताबर्डी नागपुर येथील उपोषणाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितिन राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत पारशिवनी तालुक्यातील आढावा घेण्यास प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सुरूवात केली.

देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुका व ग्रामिण विधानसभा क्षेत्रात कोरोना माहामारी चा प्रादुर्भावने थैमान चांगलेच पसरविल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. तरी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडुन पाहीजे त्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कार्य आणि सुविधेचा अभाव असल्याने शुक्रवार दि.  २१ मे २०२१ माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिना निमित्य त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत गांधी पुतळा व्हेरायटी चौक सिताबर्डी नागपुर येथे रामटेक विधान सभा क्षेत्र काॅंग्रेस नेते उदयसिंह ऊर्फ गज्जु यादव यांनी बेमुदत उपोषण सुरु केले असल्याने या उपोषणा ची पालकमंत्री श्री नितिन राऊत, जिल्हाधिकारी श्री. रविंन्द्र ठाकरे व संबंधित अधिका-यांनी दखल घेत सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यांनंतर शुकवारी रात्री १२ वाजता उपोषणाची सांगता करण्यात आली असुन शनिवार दि. २२ मे २०२१ ला जिल्हाधि कारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्री नितिन राऊत यांनी सर्व मागन्या मंजुर करून रविवार दि. २३ मे २०२१ ला पारशिवनी तालुका आढावा दौरा प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथुन सुरूवात करून प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगांव खैरी व पारशिवनी ग्रामीण रुग्णालय येथील परिस्थितीचा आढावा घेऊन तात्काळ उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी सेलोकर, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाघ,    आमदार आशिष जैस्वाल, एच डी ओ रामटेक जोंगेद्र कटियारे, तहसीलदार वरुणकुमार सहारे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्तार बागवान, नगराध्यक्षा करू णाताई आष्टणकर, कन्हान पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी, रामटेक विधानसभा कॉग्रेसचे उदयसिंह यादव, कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष दयाराम भोयर, राजेश यादव, माजी नप उपाध्यक्ष योगेंन्द्र रंगारी, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, मनिष भिवगडे, विनय यादव, नगरसेवि का गुंफा तिडके, कल्पना नितनवरे, रेखा टोहणे, कांद्री सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे,  शुभांगी बोंन्द्रे, ओमप्रकाश काकडे, अमोल प्रसाद बैशाखु जनबंधु सह काॅंग्रेस पदाधिकारी व नागरिक  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला

Sun May 23 , 2021
कांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला.  कन्हान : – कांद्री येथील रहिवासी सुनिता मधुकर वैद्य यांच्या मुलगा ॠषभ मधुकर वैद्य यांची मानसिक स्थिति खराब असल्यामुळे उपचाराकरिता नागपुरला नेले असता तो लोकमत चौकातुन लापता झाल्याने शोध घेतले असता मिळुन न आल्याने मुलाच्या आई ने सिताबर्डी पोलीस स्टेशन नागपुर येथे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta