पाळण्याचा दोरीने लावला युवकाने गळफास 

पाळण्याचा दोरीने लावला युवकाने गळफास

कन्हान,ता.१८ डिसेंबर

    पोलीस स्टेशन हद्दीतील सत्रापूर येथे युवकाने मधल्या खोलीत असलेला फाट्याला बांधलेल्या पाळण्याचा दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली.

   प्राप्त माहितीनुसार, रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी रात्री साळे बारा ते एक वा.च्या दरम्यान आई सौ.सुरेखा चंद्रभान बर्वे (वय-४८) रा.सत्रापुर, कन्हान पाणी पिण्याकरिता उठली. मुलगा मृत अभिषेक उर्फ गुलु चंद्रभान बर्वे (वय- २६) रा.सत्रापुर यानी मधल्या खोली मधील वरील फाट्याला बांधलेल्या पाळण्याचा दोरीला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसल्याने सौ.सुरेखा चंद्रभान बर्वे‌ (आई) ‌किंचाळुन उठली. वडील चंद्रभान व मुलगी झोपेतुन उठुन सुरेखा का ओरडली ? हे बघण्याकरीता मधल्या खोलीत मध्ये गेले. अभिषेक ‌‌गळफास लावलेल्या अवस्थेत पाडण्याला अडकुन दिसला. चंद्रभान यांची पत्नी आणि मुलीने मिळुन त्याला खाली उतरविले. त्याला हालवुन बघीतले असता त्यांने कोणत्याही प्रकारे हालचाल केली नाही. मृतक अभिषेक याला रुग्णालयात कामठी येथे नेले‌‌ येथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले.        चंद्रभान बर्वे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात एएसआई सुर्यभान जळते, मंगेश ढबाले करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भुखंड विक्रीने विकासावर आणि मुलभूत सुविधावर प्रश्न माजी आ.डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांचे 22 डिसेंबर पासुन साखळी उपोषण

Tue Dec 20 , 2022
भुखंड विक्रीने विकासावर आणि मुलभूत सुविधावर प्रश्न माजी आ.डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांचे 22 डिसेंबर पासुन साखळी उपोषण कन्हान, ता.२० डिसेंबर         कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा मालकीचा भुखंड विक्री झाल्याने शहराच्या विकासावर आणि मुलभूत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने, सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व […]

You May Like

Archives

Categories

Meta