विश्व पर्यावरण दिवसी पिंपळाचे व आंब्याच्या वृक्षाचे केले वृक्षारोपण

विश्व पर्यावरण दिवसी पिंपळाचे व आंब्याच्या वृक्षाचे केले वृक्षारोपण

#) कन्हान शहर विकास मंच द्वारे विश्व पर्यावरण दिवस साजरा. 

कन्हान : –  शहरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन या लाटेत ऑक्सीजनची कमतरता भासुन  शहरातील कितीतरी लोकांचा मृत्यु झाल्याने नागरिकां त भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक कन्हान येथे आंब्याचे तर प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान ला पिंपळाचे वृक्षारोप ण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला .

              देशात, राज्यात, जिल्ह्यात, शहरात कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असुन या दुसरी लाटेत ऑक्सीजनची कमतरता भासुन शहरातील कितीतरी लोकांचा मृत्यु झाल्याने नागरिकांच्या हितार्थ कोरोना विषाणुची साखळी तोडण्याकरिता आणि पर्यावरणा चा समतोल राखुन नैसर्गिक ऑक्सीजन मिळण्याकरि ता कन्हान शहर विकास मंच द्वारे शनिवार (दि.५ ) जुन ला जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधुन  गांधी चौक कन्हान येथे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपा ठी यांचा हस्ते आंब्याचे वृक्षारोपण तर प्राथमिक आरो ग्य केंन्द्र कन्हान येथे डॉ रोहित आचारे व प्रल्हाद कुंभरे यांच्या हस्ते पिंपळाचे वृक्षीचे वृक्षारोपण करून जनहितार्थ कार्याने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषा ध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, प्रविण माने, सुषमा मस्के, वैशाली खंडार सह मंच पदाधिका री उपस्थित होते. 


      वृक्षरोपनाने विश्व पर्यावरण दिवस साजरा. 

कन्हान : – विश्व पर्यावरण दिवसा निमित्य  संकल्प ग्रामोत्थान बहुद्देशीय संस्था टेकाडी संलग्न नेहरू युवा केंद्र नागपुर द्वारे न्यु वसाहत टेकाडी येथील वाचनालय परिसरात वृक्षरोपन करून विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव अरविंद सिंह यांनी युवकांना पर्यावरणा चे महत्व स्पष्ट करित पर्यावरण असंतुलित होऊन वातावरण दूषित तथा अनेक महामारी चा सामना करावा लागत आहे.  यावेळी युवकांनी पर्यावरणाच्या संरक्षणा करिता लोकांत जनजागरूता करण्याचा संकल्प घेतला.  कार्यक्रमाच्या यशस्विते करिता प्रमोद खोरे, विदेश भोवते, आशूतोष कुमार, वैभव सिंह, शुभम कुंभलकर, प्रियांशु सिंग, आविष्कार रथकंठे, आयुश यादव आदी उपस्थित राहुन परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

अवैधरीत्या हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्या आरोपीस अटक

Thu Jun 10 , 2021
अवैद्यरित्या हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणा-या आरोपीस अटक.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत २ किमी अंतरावर हरिहर नगर कांन्द्री येथे आरोपी प्रदीप उर्फ गोलु देवानंद हा विनापरवाना अवैधरित्या हातात तलवार धारदार शस्त्र घेऊन लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होईल अश्या स्थितीत मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल […]

You May Like

Archives

Categories

Meta