ऑटो चालकाचा मृत्यू ; मोहपा कनयाडोल मार्गावरील घटना

सावनेर : आटो पल्टी झाल्याने झालेल्या अपघातात चालक विरेन्द्र वासुदेव बागडे ( 58 ) यांचा आटो खाली दबून मृत्यू झाला . ही घटना आज दि . 20 रोजी सकाळी 9:30 ते 10 च्या मोहपा रोडवरील सुमारास कन्याडोल येथे घडली .

मृत विरेंद्र वासुदेव बागडी

मिळालेल्या माहितीनुसार विरेन्द्र हा आटोचालक असून तो मोहपा मार्गाने शेतात मजुरी करणाऱ्या महिलांना शेतात सोडून परत सावनेरला परत येत असतान , आटो मोहपा शिवारातील कन्याडोल येथे पलटी झाला . रोड सुनसान असल्याने विरेन्द्र हा त्या आटोखाली अर्धा पाऊण तास दबून राहीला . माहिती मिळताच समाजसेवी हितेश बनसोड व सावनेर पोलिस घटना स्थळी पोहचुन सावनेर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . मृतक विरेन्द्र नगरसेवक सुजीत बागडे यांचे मोठे बंधु आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पारशिवनी तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटी मुळे ५०७६ शेतक-यांच्या शेतपिकाचे नुकसान

Thu Jan 20 , 2022
पारशिवनी तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटी मुळे ५०७६ शेतक-यांच्या शेतपिकाचे नुकसान कन्हान : – मागील आठवडयात झालेल्या अवकाळी जोरदार पाऊस व गारपिटीमुळे पारशिवनी तालुक्यातील आदिवासी बहुल सह ४३ गावातील ५०७६ शेतकर्‍यांच्या ३४३८.१० हेक्टर आर जिरायत पिक, बगायत पिक, फळपीक सह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे महसूल विभाग पटवारी, कृषी विभाग व पंचायत […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta