महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
कन्हान ता.2 ऑक्टोबर

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शिवशक्ती आखाडा येथे दि.2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी लहान चिमुकल्यानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त वेशभूषा साकारून अल्पसा परीचय करून दिला. या कार्यक्रमाचा निमित्ताने शिवशक्ती आखाडाचा वतीने विद्यार्थी करीता भाषण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकुण 60 विद्यार्थी सहभागी झाले असून सोनू नाकाडे हिने प्रथम क्रमांक पटकवला.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शांताराम जळते सर उपस्थित होते .यांनी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांचा जीवनावर प्रकाश टाकत भाषनातुन
मुलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवशक्ती आखाडा प्रमुख पायल येरणे, निकिता येरणे, हर्षल राऊळ, समीक्षा राऊळ, मिथिलेश कडू, आरुष येरणे उपस्थित होते. पायल येरणे यांनी सूत्रसंचालन केले तर तृप्ती येवले यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाचे समारोप केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री की जयंती केली साजरी : कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन

Sat Oct 3 , 2020
*महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री की जयंती केली साजरी * कन्हान शहर विकास मंच ने केले आयोजन कन्हान – कन्हान शहर विकास मंच च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे प्रंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचा जयंती निमित्य गांधी चौक येथे थटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात कन्हान पोलीस स्टेशन […]

Archives

Categories

Meta