जमिनीच्या मालकी हक्काच्या जुन्या वादातून पोटभरे परिवारात मारहाण ; एक जखमी

जमिनीच्या मालकी हक्काच्या जुन्या वादातुन पोटभरे परिवारात मारहाण एक जख्मी. 

#) दोन्ही गटातील तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन ला एकमेका विरूध्द गुन्हा दाखल.  

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री बस स्टाॅप येथे फिर्यादीचा मुलाने मित्राकडुन उधारी दिलेले रूपये परत मांगुन आणले असता आरोपी हा दारुच्या नशेत फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाजवळ येऊन जुन्या भांड ण्याचा कारणावरुन फिर्यादी सोबत वाद-विवाद करुन मारहाण केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी सौ इंद्र कला पोटभरे च्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.

       प्राप्त माहितीनुसार सोमवार (दि.१४) जुन २०२१ ला सायंकाळी ६:०० वाजता दरम्यान फिर्यादी सौ इद्रकला रामकृष्ण पोटभरे वय ५८ वर्ष रा. कान्द्री बस स्टाॅप जवळ वार्ड क्र. ५ चा मुलगा रविंन्द्र याने मित्र रंजित उइके याला उधारीचे दिलेले ५००० रुपये परत मागुन घेतले असताना आरोपी क्र. १) दिपक पोटभरे हा दारु पिऊन दारुच्या नशेत फिर्यादी व फिर्यादीचा मुला जवळ ये़ऊन जुन्या भांडण्याच्या कारणावरुन फिर्यादी सोबत वाद-विवाद करुन दिपक पोटभरे ने फिर्यादीच्या हातातील ५००० रुपये हिसकावले असता फिर्यादीच्या मुलाने आरोपीस हटकले असता आरोपी दिपक पोटभरे याने फिर्यादी च्या मुला सोबत झगडा भांडण करुन मारपीट करित असताना आरोपी क्र. २) प्रकाश पोटभरे हातात लोखंडी पाईप घेऊन फिर्यादी जवळ येवुन लोखंडी पाईपाने मारुन जख्मी केले. तेव्हाच फिर्यादीचा मोठा मुलगा नरेन्द्र हा तेथे भांडण सोडविण्यास आला असता आरोपी क्र.३) सुरेश पोट भरे हा तेथे आला आणि त्याने आरोपी प्रकाश पोटभरे याचा हातातील लोखंडी पाईप घेवुन फिर्यादी व फिर्या दीचा मोठा मुलगा नरेन्द्र या दोघांना लोखंडी पाईपाने डोक्यावर, हातावर, पायावर मारुन जख्मी करून तिन्ही आरोपींनी संगणमत करून फिर्यादी व फिर्यादी च्या मुलांना शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून व वैधकिय अहवालावरून अप क्र १७७/२०२१ कलम ३९२, ३२४, ५०४, ५०६, ३४ भांदवि नुसार गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्ग दर्शनात पुढील तपास पोलीस हवालदार खुशाल रामटेके, पोना मंगेश ढबाले हे करित आहे. 

         कांद्री बस स्टाप जवळील पोटभरे कुटुबात  जमिनीच्या मालकी हक्का करिता सुरू असलेल्या जुन्या वादामुळे सोमवार (दि.१४) जुन २०२१ ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान भाडण होऊन एक गंभीर जख्मी झाल्याने कांद्री बस स्टाप जवळील पोटभरे कुटुबातील जमिनीच्या मालकी हक्का करिता सुरू असलेल्या वादामुळे फिर्यादी दिपक हरिभाऊ पोटभरे यांचे तक्रारी वरून आरोपी १) देवेंद्र पोट़भरे, २) नरेंद्र पोटभरे, ३) सुरेंद्र पोटभरे, ४) रामकृष्ण पोट भरे व ५) सौ इंद्रावती पोटभरे सर्व रा. वार्ड क्र ५ कांद्री यांचे विरूध्द अप क्र १७६/२०२१ कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर सौ इंद्रकला रामकृष्ण पोटभरे वय ५८ वर्ष रा कांद्री यांचे तक्रारीवरून आरो पी १) दिपक पोटभरे, २) प्रकाश पोटभरे, ३) सुरेश पोटभरे तिन्ही आरोपी विरूध्द अप क्र.१७७/२०२१  कलम  ३९२, ३२४, ५०४, ५०६, ३४ भांदवि नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला असुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन्ही गटा विरूध्द एक मेका विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे. 

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ

Thu Jun 17 , 2021
मनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ #) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम मस्के चा सेवाभावी उपक्रम.  कन्हान : – शहरात फिरणा-या एका मनोरूग्ण युवका स पुरूषोत्तम मस्के हयानी आपुलकीचा हाथ देत त्या स फळे खाऊ घालुन कटींग, दाढी व आंघोळ करून नविन कपडे देऊन व्यवस्थित करून सेवाभावी उपक्र म राबवुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta