वेकोलि खुली खदान चा कोळसा चोरी केल्याने पकडुन तिन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

वेकोलि खुली खदान चा कोळसा चोरी केल्याने पकडुन तिन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तर भागात चार कि मी अंतरावर असलेल्या फुकट नगर नाल्या जवळ कांद्री येथे तीन आरोपीने संगमत करून वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथुन कोळसा चोरून आणुन ट्रक मध्ये भरताना वेकोलि सुरक्षा अधिकारी, रक्षकांनी पकडुन कन्हान पोस्टे ला तक्रार केल्याने कन्हान पोलीसानी तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.३०) जानेवारी ला दुपारी २ वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा अधिकारी संतोष इंद्रासेन यादव वय ३६ वर्ष राह. खदान नंबर ३ माडीबाबा, कन्हान हे आपल्या सुरक्षा रक्षकासह सह वेकोलि खुली कोळसा खदान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी १) फारूख अब्दुला शेख वय २५ वर्ष,२) सागर राजु यादव वय ३० वर्ष दोन्ही राह.फुकट नगर कांद्री ३) अभिषेक ऊर्फ चिंटु बब्लु सिंग वय २४ वर्ष राह. खदान नं.६ यांनी संगमत करून वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथुन कोळसा चोरून कांद्री फुकट नगर नाल्याजवळ आणुन ठेवला. सदर कोळशा हा पिलोडर च्या मदतीने ट्रक मध्ये भरून वेकोलि च्या वजन काट्यावर वजन केले असता एकुण ८ टन ६० किलो चोरीचा कोळसा किंमत अंदाजे एकुण ४०,३०० चा मुद्देमाल वेकोलि कामठी खुली कोळसा खदान मध्ये जमा करण्यात आला. अश्या फिर्यादी संतोष इंद्रासेन यादव यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेत पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बालक - बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रम थाटात  *भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम

Tue Feb 1 , 2022
*बालक – बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रम थाटात  *भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम कन्हान – कन्हान शहरात भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने तुन साकारित स्वस्थ बालक बालिका प्रतियोगिता व […]

You May Like

Archives

Categories

Meta