गहुहिवरा शेतातील साळे चार लाखाचे साहित्य चोरी

 

गहुहिवरा शेतातील साळे चार लाखाचे साहित्य चोरी

कन्हान,ता.14 ऑगस्ट

   पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा गहुहिवरा शेत शिवारातील प्रतिक संगीतराय यांच्या शेतातुन अज्ञात चोरट्यांनी एकुण ४,५०,००० रुपयांचे गोडाऊन बांधकामाच्या लोखंडी साहित्य चोरून नेल्याने संगीतराय यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    शुक्रवार (दि.१२) ऑगस्ट ला सायंकाळी ६.१५ वाजता ते शनिवार (दि.१३) ऑगस्ट ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान प्रतिक संगीतराय वय ३४ वर्ष राह. इंद्रप्रस्थ ले आउट स्वावलंबी नगर नागपुर यांचे मौजा गहुहिवरा शिवारात २.३२ एकर शेत आहे. सदर जागी त्यांनी व्यवसाया करीता लोखंडी गोडाउन बांधकामा साठी २ महिण्या अगोदर २२ टन लोखंडी साहित्य अंदाजे किंमत १२ लाख रूपये असे विकत घेतले होते . साहित्याचे देखरेख करीता दिवसा सुरक्षा रक्षक ची नेमणुक केली असुन रक्षक सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत हजर राहतो. तसेच सामान बघण्याकरीता प्रतिक संगीतराय हे स्वतः येत जात होते. शुक्रवार (दि .१२) ऑगस्ट ला शेतात जावुन सामान चेक केले व दुपारी १.३० वाजता दरम्यान घरी निघुन गेले. शनिवार (दि.१३) ऑगस्ट ला सकाळी ९.३० वाजता दरम्यान प्रतिक संगितराय यांच्या शेतातील सुरक्षा रक्षक विजय चौधरी राह. खंडाळा याने शेतातील बांधकामासाठी असलेले काही लोखंडी साहित्य नसल्याचे सांगितल्याने प्रतिक संगीतराय यांनी साहित्याची पाहणी केली असता अंदाजे लोखंडी ३ टन परलीन किंमत १,५०,००० रूपये कनेक्टर २ टन किंमत १,००,००० रूपये, २ टन पाईप किंमत १,००,००० रूपये, टायरॉड ५०० किलो किंमत ५०,००० रूपये तसेच इतर लोखंडी ५०० किलो किंमत ५०,००० रूपये असे एकुण ४,५०,००० रूपयाचा लोखंडी गोडाउन बांधकामासाठी लागणारा मुद्देमाल दिसला नसल्याने शेतातील लोखंडी गोडाउन बांधकामाचे साहित्य  अज्ञात चोरटयाने चोरी केल्याने पोलीसांनी प्रतिक संगीतराय यांच्या तक्रारीने पो.स्टे कन्हान ला आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतिश मेश्राम हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

एसडीओ सवंगपते व्दारे शेतात विजे पडुन मृत महिलेच्या मुलांना दोन सायकल भेट

Mon Aug 15 , 2022
  एसडीओ सवंगपते व्दारे शेतात विजे पडुन मृत महिलेच्या मुलांना दोन सायकल भेट    उपविभागीय अधिकारी रामटेक मा. वंदना सवंगपते च्या वतीने सायकल व आर्थिक मदत कन्हान,ता.15 ऑगस्ट   निलज (खंडाळा) शेत शिवारात विज पडुन शेतमजुर नंदाबाई खंडाते चा मृत्यु झाल्याने शासना तर्फे आर्थिक मदत करण्यात तर आलीच, त्याच प्रमाणे […]

You May Like

Archives

Categories

Meta