आंबेडकर चौक,कन्हान येथे मा.शरद पवार यांचे जोरदार स्वागत

आंबेडकर चौक,कन्हान येथे मा.शरद पवार यांचे जोरदार स्वागत

कन्हान,ता.०२ एप्रिल

       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी आंबेडकर चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले.

       मा.शरद पवार साहेब भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री राहिले असुन महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पद भूषवले आहे. रविवार (दि.२) एप्रिल रोजी मध्यप्रदेश, शीवनी येथे विरसा ब्रिगेड अधिकार परिषद कार्यक्रमात सहभागी होणार होते. सकाळी १० वाजता कन्हान आंबेडकर चौक येथे मा.शरद पवारसाहेब, राज्याचे माजी गृहमंत्री मा.अनिल देशमुख , माजी मंत्री मा.छगन भुजबल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा.शिवराज बाबा गुजर यांचे आगमन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांचा पदाधिकार्यांनी व सदस्यांनी फुलाच्या वर्षाने, ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडुन, पुष्प गुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.

     प्रसंगी रामटेक विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष किशोर बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, रामटेक विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देवीदास तडस, कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष, योगेंद्र रंगारी , नगरसेवक मनिष भिवगडे, नगरसेविका रेखा टोहणे , आनंद बेलसरे, सतीश बेलसरे, फिरोज शेख, संगीत भारती, रोहित मानवटकर, अर्चना हरडे, पुरंदास तांडेकर, ज्ञानेश्वर विघे, श्रीराम नांदूरकर, विवेक अंबरकर, उमेश भरणे, गौरव मेश्राम, अशोक पाटील , मधुकर नागपुरे जनार्दन बागडे, पंकज सप्रा, कमलेश शर्मा, डॉ. प्रदिप राणे राजू इंगोले, सोनू नागपुरे, नारद दारोडे, ज्ञानेश्वर दरोडे, अखिलेश मेश्राम, चंदन मेश्राम , प्रशांत मसार, स्वप्नील मते, मनोज शेंडे, राजु चकोले, माया ताई भोयर, योगीता भलावी सह आदि पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम

Sun Apr 2 , 2023
महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम कन्हान,ता.०२ एप्रिल      बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०२ व्या जयंती निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .     सोमवार (ता.३) एप्रिल रोजी महानत्यागी बाबा जुमदेव यांचा जयंती निमित्य महानत्यागी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta