कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हिंदु गौरव दिवस थाटात साजरा*

*कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हिंदु गौरव दिवस थाटात साजरा*

#) हनुमान मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे हिंदु गौरव दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर गांधी चौक येथे करुन प्रभु श्रीराम च्या प्रतिमेचे पुजन करुन व विविध कार्यक्रमाने हिंदू गौरव दिवस थाटात साजरा करण्यात आला .
मागील वर्षी ५ आॅगस्ट २०२० ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर भुमिपुजन सोहळा संपन्न झाला असुन या भुमिपुजन ला एक वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी हनुमान मंदिर गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन कन्हान शहर विकास मंच चे कार्यकारी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीराम च्या प्रतिमेचे पुजन करुन “जय श्री राम जय जय श्री राम” चा जयघोष करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असुन आरती , प्रसाद वितरण करुन विविध कार्यक्रमाने हा कार्यक्रम हिंदू गौरव दिवस म्हणुन थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे कार्यकारी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , जेष्ठ नागरिक भरत सावळे , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , पौर्णिमा दुबे , अक्षय फुले , चंदन मेश्राम , राजु पचकलसिया , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

युवक काॅंग्रेस च्या निवेदनाची कांद्री सरपंचानी घेतली दखल

Sun Aug 8 , 2021
युवक काॅंग्रेस च्या निवेदनाची कांद्री सरपंचानी घेतली दखल कन्हान : – कांद्री- कन्हान परिसरात गेल्या काही दिवसापासुन डेंगु व साथीच्या रोगाचे रूग्ण आढळत असल्याने युवक काॅंग्रेस च्या पदाधिका-यानी कांद्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे यांना एक निवेदन देऊ न डेंगु व साथीच्या रोगाचा प्रसार थांबविण्या करिता तात्काळ उपाय योजना करण्याची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta