कन्हान नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला 

कन्हान नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

कन्हान,ता.१६ जुलै

    निलज शिवारातील कन्हान नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याने पोलीसांनी गुंडेराव चकोले यांचा तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे.

    मिळालेल्या माहिती नुसार, रविवार (दि.१६) जुलै ला सकाळी ११.३० वाजता दरम्यान गावातील पोलीस पाटील गुंडेराव श्रावण चकोले (वय ४७) रा. निलज हे गावालगत कन्हान नदी परिसरात फिरण्याकरिता गेले. कन्हान नदी पात्रात एक अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यातील रेतीवर उभड़या अवस्थेत पुरुष दिसुन आला. गुंडेराव चकोले यांनी मृत देहाची पाहणी केली. अंगात पिवळ्या रंगाची टी शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्टं व पायात कुठलेही प्रकारची चप्पल वगैरे नव्हती. गुंडेराव चकोले यांनी नदीत मासेमारी करणा-या लोकांना बोलवुन मृतदेहाची पाहणी केली असता ओळख पटली नाही. यानंतर चकोले यांनी निलज बिट पोलीस जमादार सदाशिव काठे यांना मोबाईल वरुन अनोळखी इसमाचा मृतदेह नदी पात्रात रेतीवर असल्याचे सांगितले. पोलीस जमादार सदाशिव काठे, दिपक कश्यप, सतिश फुटाणे, सम्राट वनपर्ती सहकारी स्टॉफ सोबत घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाला बाहेर काढुन घटनास्थळावर पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी ग्रामिण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी गुंडेराव चकोले यांचा तक्रारीवरून मर्ग क्र. २९/२३ कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सदशिव काटे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहरात जुन्या वादातून भरदिवसा युवकाची हत्या एक जख्मी, तीन आरोपी अटक

Thu Jul 20 , 2023
कन्हान शहरात जुन्या वादातून भरदिवसा युवकाची हत्या एक जख्मी, तीन आरोपी अटक कन्हान, ता. २० जूलै पोलीस स्टेशन हद्दीतील सत्रापुर येथे, शितला माता मंदिरा जवळ जुन्या वादातुन एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन नागरिकात चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.       […]

You May Like

Archives

Categories

Meta