आयुष्यमान दवाखाना व रिसर्च सेंटर व्दारे कन्हान ला कोरोना जनजागृती 

आयुष्यमान दवाखाना व रिसर्च सेंटर व्दारे कन्हान ला कोरोना जनजागृती 

कन्हान : –  आयुष्यमान मल्टीस्पेशलिटी दवाखाना व रिसर्च सेंटर कामठी आणि आरोग्य सेना च्या सौजन्याने कोविड – १९ संसर्ग रोगाविषयी प्रतिबंधक उपाय योजना विषयी चार दिवसीय जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.    

     शनिवार (दि.१७) ला कन्हान येथील अांबेडकर चौक, तारसा रोड चौक व शहरातील मुख्य स्थळी आयुष्मान मल्टीस्पेशलिटी दवाखाना व रिसर्च सेंटर कामठी आणि आरोग्य सेना च्या सौजन्याने कोरोना विषाणु आजाराचा प्रादुभाव रोखण्याकरिता शासनाच्या नियमाची काटेकोरपणे पालन करित कोरोना आजारावर मात करून विजय मिळविण्याकरिता डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, पोलीस या कोरोना योध्दाना नागरिकांनी सहकार्य करून कोरोना आजाराची भिती बाळगु नये तरच या आजारास हद्दपार करता येईल, अशी नागरिकांत जनजागृती करण्यात आली.

ही मोहीम चार दिवस राबविण्यात येत असुन आयुष्यमान मल्टीस्पेशलिटी दवा खाना व रिसर्च सेंटर कामठी चे संचालक डॉ त्रिदिप गुहा यांच्या मार्गदर्शनात डॉक्ट र, नर्स व आरोग्य सेनाचे सेवक परिश्रम घेत आहे. या जनजागृती कार्यक्रमास  कन्हान थानेदार अरुण त्रिपाठी, किशोर बेलसरे, देविदास तडस, सतीश बेलसरे आदीने सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Sun Oct 18 , 2020
कन्हान ला नविन दोन रूग्णाची भर  #) वराडा येथील दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८३३ रूग्ण.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र साटक व्दारे वराडा गावात १९ संशयिताच्या स्वॅब (आरटीपीसीआर ) चाचणीत दोन रूग्णाचा अहवाल पॉझी टिव्ह आल्याने कन्हान परिसर एकुण  ८३३ रूग्ण संख्या […]

You May Like

Archives

Categories

Meta