महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

नागपूर दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबरला उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले.
मुंबई येथील चैत्यभूमीवर सकाळी मुख्यमंत्र्यासह अभिवादन केल्यानंतर ते नागपूरला आले. तेथून थेट दीक्षाभूमीवर आज दुपारी सव्वाबारा वाजता त्यांचे आगमन झाले. येथील बौध्द स्तूपाच्या आतील तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण व अभिवादन केले.
नवनिर्वाचीत आमदार अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त बी.राधाकृष्णन ,पोलीस उपायुक्त नरूल हसन यावेळी उपस्थित होते. यांनतर सामूहिकरित्या बौध्द वंदना घेण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंदत सुरई ससाई,सचिव सुधीर फुलझेले, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य एन.आर सुटे,आनंद फुलझेले, आंबेडकर महाविदयालयाच्या प्राचार्या श्रीमती बी.एन.मेहरे व विद्यार्थी उपस्थित होते.


दीक्षाभूमी येथून निघून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यांचे समवेत विभागीय आयुक्त डॉ. संजय कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिक्षकांचे वेतनास पुन्हा  विलंब , शिक्षकांना मनस्ताप

Tue Dec 8 , 2020
*शिक्षकांचे वेतनास पुन्हा  विलंब     *जि.प.प्रशासनाच्या लेटलतीफ कारभारामुळे शिक्षकांना मनस्ताप* कन्हान : शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेला करण्याबाबत शासनाने वेळोवेळी शासन निर्णय व परिपत्रके काढले असून याची तसदी नागपूर जिल्हा परिषदेने घेतलेली दिसत नाही.प्रशासनाच्या चालढकलपणामुळे शिक्षकांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही.वेतनास विलंब ही बाब आता नित्याचीच झाली असल्याचा आरोप […]

You May Like

Archives

Categories

Meta