शाहीरांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल -चंद्रपाल चौकसे शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या लवकर पूर्ण करावे – शा.राजेंद्र बावनकुळे “अबकी बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार” – कवी वाकुडकर

शाहीरांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल -चंद्रपाल चौकसे

शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या लवकर पूर्ण करावे – शा.राजेंद्र बावनकुळे

“अबकी बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार” – कवी वाकुडकर

नागपूर,ता.७ जूलै

    भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात पार पडला. शाहीर कलावंतांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलीकडे विशेष लक्ष द्यावे. शाहीर कलावतांचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी रामटेक क्षेत्रात विशेष महिलांनी पूर्ण ताकत पणाला लावावे. असे उदगार काढत चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक क्षेत्रात अप्रत्यक्षपणे उमेदवारीची घोषणा केली.

    कामठीच्या राम जानकी सभागृहात विदर्भ स्तरीय भव्य सांस्कृतिक मेळावा हजारोच्या संख्येच्या उपस्थित घेण्यात आला. यावेळी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तूमाने कार्यक्रमात उपस्थित नसल्याने कलावंतात नाराजीचा सूर होता. कलावंतांना मिळणाऱ्या मानधनात वाढ होण्याची अपेक्षा होती आणि इतर मागणीची पूर्तता करण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शाहीर कलाकार मंडळी या आशेने मेळाव्यात मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. नेहमीप्रमाणे त्यांच्या पदरी निराशा पडली.

     यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की‌ (दि.२०) डिसेंबर २०२२ हिवाळी अधिवेशना दरम्यान शाहीर कलाकारांच्या मोर्चा काढण्यात आला होता. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी मागण्या पूर्ण करू, पण आतापर्यंत एकही मागणी त्यांनी पूर्ण नाही केली. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करून तुटपुंज्या मानधन मध्ये वाढ करण्यात यावी. अशी विनंती शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी केली.

     भारत राष्ट्र समिती विदर्भ प्रमुख कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी सरपंच झाल्या बायका, शाहिरी गीत म्हणून प्रेक्षक यांना मंत्र मुग्ध केले. यावेळी सांगितले की, तेलंगणा सरकार शाहीर कलाकार यांना महाराष्ट्र सरकार पेक्षा जास्त मानधन देत आहे. “अब की बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार”  तुमच्या पूर्ण मागण्या आम्ही पूर्ण करू असे आश्वासन वाकुडकर यांनी दिले.

   मानधन समिती उपाध्यक्ष आनंदराव ठवरे यांनी सर्व शाहीर कलाकार यांना सांगितले की, मी इमानदारीने कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करील. मेळाव्यात रामटेक क्षेत्राचे सुपुत्र चंद्रपाल चौकसे, माजी आमदार देवराव रडके, काँग्रेसचे नरेश बर्वे, राजू हिंदुस्थानी, माजी जिल्हा उपाध्यक्ष शरद डोणेकर, विजय हटवार, कवी ज्ञानेश्वर वांढरे यांनी मार्गदर्शन केले. शाहीर नाना परीहार, जालना, सरपंच पंकज साबळे, पंकज बावनकर शाहीर गरीबा काळे, अंबादास नागदेवे, शंकर येवले, सुबोध गुरुजी, मोरेश्वर मेश्राम, पुरुषोत्तम खांडेकर, ब्रम्हा नवघरे, विक्रम वांढरे, संजय मेश्राम, ललकार चौहान, उर्मिला, जया बोरकर, योगिता नंदनवार, दीपमाला मालेकर, मोहन बारसागडे गोंदिया, रविबाबु हजारे, प्रकाश काळे, सुभाष वंगर, दयाल कांबळे, राजेंद्र येसकर प्रामुख्याने उपस्थित होते.

     मेळाव्यात कलावंतांनी आपले कलेचा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देण्यात आले.

   प्रसंगी आलेल्या अनेक शाहीर कलावंत, भंजन मंडळ, लोक कलावंत यांनी आप-आपल्या कलेचे सादरीकरण प्रस्तुत केले. विशेष सुरज नवघरे युवा शाहीर कलाकार आपल्या पोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुगद करून दिले. युवा शाहीर आर्यन नागदेवे, सरपंच शाहीर जया बोरकर यांचे सत्कार करण्यात आले. मेळाव्याचे आयोजक शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, गणेश देशमुख, अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, भूपेश बावनकुळे यांनी केले. यावेळी विशेष सहयोग शाहीर प्रदीप कडबे, चीरकुट पुंडेकर, विनायक नागमोते, नरेंद्र दनडारे ,गजानन वडे, सुभाष देशमुख, वीरेंद्र सिंह शेंगर, रवींद्र मेश्राम, गिरिधर बावणे, शिशुपाल अतकरे, मोरेश्वर बडवाईक, दशरथ भडंग, प्रकाश राऊत, महादेव पारसे, युवराज अडकणे, भगवान वानखेडे, नत्तूजी चरडे, विमल शिवारे, रमेश रामटेके, सुनील सरोदे केले. कार्यक्रमाचे संचालन नरेश देशमुख, सुरज नवघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाहीर अरुण मेश्राम, भगवान लांजेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर मधुकर शिंदेमेश्रम, प्रल्हाद सावरकर, लीलाधर, रामराव वडांद्रे, रायभान करडभाजने, रवी दूपारे, पुरुषोत्तम कुंभलकर, शालीक शेंडे, यशोदा सोमणाथे, चेतना शेंडे, इंदल सोमणाथे, नितीन लांजेवार, दीपक दहिकर, आशू निंदेकर, अरूणा बावनकुळे, अंकुश डडमल, श्रावण लांजेवार, फागो कावळे, सखाराम डहाके, वासुदेव तिजारे आणि शेकडो शाहीर कलाकार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कुहीत गुरूपुजन व विदर्भस्तरीय शाहीर संमेलन

Sat Jul 8 , 2023
कुहीत गुरूपुजन व विदर्भस्तरीय शाहीर संमेलन नागपूर,ता.८ जूलै        भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली व ओरेंज सिटी बहुउद्देशीय संस्था विहीरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कुही येथे रविवार (दि.९) जुलै रोजी येथे गुरुपूजन व शाहीर संमेलन आयोजित करण्यात आला आहे.         दरवर्षीप्रमाणे यंदाही (दि.९) जुलै रोजी […]

You May Like

Archives

Categories

Meta